ETV Bharat / state

लातुरात २५ लाखांचा गुटखा जप्त; बंदीत संधी शोधणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

author img

By

Published : Apr 3, 2020, 12:59 PM IST

राज्यात गुटखा विक्रीवर बंदी आहे. तसेच सध्या संचारबंदी लागू असल्याने लातूर जिल्ह्यातील पान-टपऱ्या देखील बंद आहे. असे असतानाही कासरगाव येथे एका शेताजवळच्या गोडाऊनमध्ये साठवणूक केलेला २५ लाखांचा गुटखा पोलिसांनी पकडला आहे.

rupees 25 lakh Gutkha seized in Latur
लातुरात 25 लाखांचा गुटखा जप्त

लातूर - राज्यात गुटखा विक्रीवर बंदी आहे. तसेच सध्या संचारबंदी लागू असल्याने लातूर जिल्ह्यातील पानटपऱ्या देखील बंद आहे. असे असतानाही कासरगाव येथे एका शेताजवळच्या गोडाऊनमध्ये साठवणूक केलेला २५ लाखांचा गुटखा पोलिसांनी पकडला आहे. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधीत व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातुरात 25 लाखांचा गुटखा जप्त...

हेही वाचा... धक्कादायक! मुख्याध्यापक पित्याचा पोटच्या तीन मुलींवर अत्याचार, केज पोलिसात गुन्हा दाखल

लातूर शहरालगत असलेल्या कासारगाव शिवारात मोहिते यांच्या एका शेताजवळच्या गोडाऊनमध्ये गुटख्याची साठवणूक करण्यात आली आहे. अशी माहिती खबऱ्यांमार्फत शहर उपअधीक्षक सचिन सांगळे यांना गुरुवारी रात्री मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या गोडाऊनमध्ये गुटखा असल्याची खात्री होताच त्यांनी संबंधी व्यापारी प्रेम मोरे यांना ताब्यात घेतले आणि पंचनामा केला. या कारवाईत एकूण २५ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

प्रेम मोरे या व्यापाऱ्याची लातूर शहरातील गांजगोलाई येथे पान टपरी असून ग्रामीण भागात हा गुटखा पुरवला जात होता. कर्नाटकातून हा गुटखा आणला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावरून व्यापारी प्रेम मोरे याच्यावर लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सध्या पान टपऱ्या बंद असतानाही या गुटख्याची विक्री केली जात होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नवले यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.