ETV Bharat / state

लातुरात कीर्तनकाराचा खून की अपघात? खडगाव परिसरात खळबळ - लातुरात किर्तनकाराचा खून

जनार्दन साठे (वय 58) असे मृताचे नाव आहे. या घटनेन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वी जनार्दन साठे यांचा मुलगा आकाश साठे याचा शेती वादातूनच खून करण्यात आला होता. त्यामुळे, शेतीच्या वादातूनच ही घटना घडवून आणल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जनार्दन साठे हे श्री वैभव गणेश मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष आणि कीर्तनकार होते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून चारचाकी वाहनातून एकास ताब्यात घेतले आहे.

मृत किर्तनकार जनार्धन साठे
author img

By

Published : Nov 7, 2019, 1:05 PM IST

लातूर - शहरालगतच्या खडगाव येथे दुचाकीस्वाराला चारचाकी सफारी गाडीने मागून धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी 6 च्या दरम्यान ही घटना घडली. जनार्दन साठे (वय 58) असे मृताचे नाव आहे. ते श्री वैभव गणेश मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष आणि कीर्तनकार होते. शेतीच्या वादातून ही घटना घडवून आणल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून हा घात आहे की अपघात याचा शोध एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घेत आहेत.

car
सफारी गाडी

जनार्दन साठे हे नेहमीप्रमाणे खडगाव येथील शेतामधून लातूरकडे दुचाकीवर निघाले होते. याच दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या एम.एच. 12 डी. एम. 7378 या गाडीने त्यांना धडक दिली. यामध्ये जनार्दन साठे हे गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. काही महिन्यांपूर्वी जनार्दन साठे यांचा मुलगा आकाश साठे याचा शेती वादातूनच खून करण्यात आला होता. त्यामुळे हा सुद्धा घात असल्याचे बोलले जात आहे. वर्षभरातच मुलापाठोपाठ वडिलांचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा - जतमध्ये सावकाराच्या त्रासास कंटाळून तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून चारचाकी वाहनातून एकास ताब्यात घेतले आहे. इतरांचा शोध सुरू आहे. चारचाकी गाडीतील सर्वजण बाहेरगावचे असून ते शहरातील एका लॉजवर राहत होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. ते नेमके कशासाठी आले होते आणि यामागे कुणाचा हात आहे, अशा सर्व बाबींचा शोध पोलीस घेत आहेत.

Intro:लातुरात किर्तनकाराचा खून की अपघात? खडगाव परिसरात खळबळ
लातूर : शहरालगतच्या खडगाव येथे एका दुचाकीस्वाराला मागून चारचाकी सफरीने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी 6 च्या दरम्यान गजबजलेल्या या रोडवर ही घटना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सफारी मधील एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून हा घात आहे की अपघात याचा शोध एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घेत आहेत.
Body:जनार्धन साठे (वय 58) हे नेहमीप्रमाणे खडगाव येथील शेतमधून लातूरकडे दुचाकीवर निघाले होते. याच दरम्यान, पाठीमागून एम. एच. 12 डी. एम. 7378 या सफारीने मागून जोराची धडक दिली. यामध्ये जनार्धन साठे हे गंभीर जखमी झाले होते. उपचाराकरिता त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. शेतीच्या वादातून ही घटना घडवून आणल्याचा अंदाज वर्तीवला जात आहे. कारण काही महिन्यांपूर्वी जनार्धन साठे यांचा मुलगा आकाश साठे याचा शेती वादातूनच खुन करण्यात आला होता. त्यामुळे हा सुद्धा घातच असल्याचे बोलले जात आहे. मात्र, वर्षातच मुलालपाठोपाठ वडिलांचाही अशाप्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. जनार्धन साठे हे श्री वैभव गणेश मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष शिवाय कीर्तनकार होते. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचारी यांनी धाव घेतली असून चारचाकी वाहनातून एकास ताब्यात घेतले आहे शिवाय इतरांचा शोध सुरू आहे. चारचाकी गाडीतील सर्व हे बाहेर गावचे असून ते शहरातील एका लॉजवर राहत होते. Conclusion:ते नेमके कशासाठी आले होते.. यामागे कुणाचा हात आहे या सर्व बाबींचा शोध पोलीस घेत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.