लातूर - विलासराव देशमुख यांची आज जयंती असून लॉकडाऊनमुळे कार्यक्रमाची रेलचेल नाही. तरी सोशल मीडियावर भावना व्यक्त करण्यात येत आहेत. यातच रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर केलेला व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
विलासराव देशमुख यांची आज जयंती असून त्यांची भाषणे, झालेले कार्यक्रम आज नव्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आजही विलासराव देशमुख यांचा मोबाईल सुरू असून त्यांच्या जयंती निमित्त अनेकजण या क्रमांकावर फोन करुन भावना व्यक्त करत आहेत.
दुसरीकडे मुलगा रितेश देशमुख यांनी विलासराव देशमुख यांच्या कोटला घेऊन तयार केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अग्निपथ या चित्रपटातील गाण्याचे बोल असून विलासराव देशमुख यांच्याबद्दलच्या भावना त्याने व्यक्त केल्या आहेत. शिवाय भाषणशैलीवर वर्चस्व असलेल्या विलासराव यांची गाजलेली भाषणेही आज समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.