ETV Bharat / state

लातुरातील काही बंडखोर थंड, अनेकांनी थोपटले दंड

लातुरातील भाजपमध्ये सुरू असलेल्या बंडखोरांना थंड करण्यात पक्षाला यश आले असले तरी आम्ही लढणारच असे म्हणत अनेकांनी दंड थोपटले आहेत. यामुळे भाजपसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

संपादीत छायाचित्र
author img

By

Published : Oct 7, 2019, 8:27 PM IST

लातुर - लातुरातील भाजपमध्ये सुरू असलेल्या बंडखोरांना थंड करण्यात पक्षाला यश आले असले तरी आम्ही लढणारच असे म्हणत अनेकांनी दंड थोपटले आहेत. यामुळे भाजपसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

औसा मतदारसंघातील प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जागेसाठी शिवसेनेतील बंड केलेले माजी आमदार दिनकर माने यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. भाजपला जागा सुटल्याने शिवसैनिकात रोष होता. तानाजी सावंत यांच्या मध्यस्थीमुळे हा वाद शांत झाला आहे. मात्र, भाजपातील संभाजी पाटील समर्थक बजरंग जाधव यांनी अर्ज माघार घेतला नाही. तर किरण उटगे यांनी अर्ज मागे घेतला आहे. पालकमंत्री संभाजी पाटील यांचे बंधू अरविंद पाटील यांनी उघड-उघड बजरंग जाधव यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या अडचणी कायम आहेत. उदगीर येथील भाजपचे दोनवेळा आमदार असलेले सुधाकर भालेराव याचे तिकीट कापण्यात आले होते. येथे डॉ. अनिल कांबळे यांनी उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे भालेराव यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मुख्यमंत्र्यांनी फोनवर त्याची मन धरणी केली आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपचा प्रचार करणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा - 'माझं काय चुकलं'... उदगीरचे भाजप आमदार बंडाच्या पवित्र्यात

लातूर ग्रामीण मतदारसंघाची जागा युतीत भाजपच्या वाट्याला आली होती. दोन वेळा येथून रमेश कराड यांनी लढत दिली. काही हजार मतांनी त्याचा पराभव झाला होता. यावेळीही त्यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र, ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली त्यानंतर त्यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज त्यांनीही अर्ज मागे घेतला आहे. ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यामुळे त्यांनी सचिन देशमुख या नवख्या उमेदवाराला रिंगणात उतरवले आहे.

हेही वाचा - जनाधार उदगीरकरांचा; बंडखोरीचा विषय चर्चेला, विकासाचा मुद्दा राहिला बाजूला

अहमदपूर मतदारसंघात अपक्ष निवडून आलेले आमदार विनायकराव पाटील भाजपात आले होते. त्यांना भाजपने तिकीट दिले. यामुळे भाजपातील निष्ठावंत संतप्त होत बंडखोरी केली यात आयोध्या केंद्रे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत लढत देणार, असा निर्धार केला. दिलीप देशमुख यांनी ही मुख्यमंत्र्यांच्या फोननंतरही आपण लढणारच, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बंडखोरीवर अंकुश घालण्यावर यश आले असले तरी काहीजण निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत.

Intro:लातुरातील बंडाळी वर अंकुश; मात्र अनेक जण रिंगणात
लातुर : लातुरातील भाजपात सुरू असलेल्या बंडाळी वर अंकुश ठेवण्यात पक्षाला यश आले असले तरी आम्ही लढणारच यावर ठाम असलेल्या काही उमेदवारामुळे निवडणुकीत भाजपा समोर आव्हान निर्माण झाले आहे.
Body:औसा मतदारसंघातील अतिशय प्रतिष्ठा पणाला लागलेला जागेसाठी शिवसेनेतील बंड केलेलं माजी आमदार दिनकर माने यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. भाजपाला जागा सुटल्याने शिवसैनिकात रोष होता. तानाजी सावंत यांच्या मध्यस्थीमुळे हा वाद शांत झाला आहे. मात्र भाजपातील संभाजी पाटील समर्थक बजरंग जाधव याचे अर्ज कायम आहे तर किरण उटगे यांनी अर्ज मागे घेतला आहे.पालकमंत्री संभाजी पाटील यांचे बंधू अरविंद पाटील यांनी उघड बजरंग जाधव यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या अडचणी कायम आहेत. उदगीर येथील भाजपाचे दोन टर्म आमदार असलेले सुधाकर भालेराव याचे तिकीट कापण्यात आले होते. येथे डॉ. अनिल कांबळे यांनी उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे भालेराव यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मुख्यमंत्री यांनी फोन वर त्याची मनधरणी केली आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपाचा प्रचार करणार असल्याचे सांगितले आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघाची जागा युतीत भाजपाच्या वाट्याला आली होती दोन वेळा येथून रमेश कराड यांनी लढत दिली काही हजार मतांनी त्याचा पराभव झाला होता. यावेळी त्यांनी तयारी केली मात्र, जागा शिवसेनेला सोडण्यात आली त्यांनी ही शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी दाखल केली. आज ती मागे घेतली आहे. ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यामुळे त्यांनी सचिन देशमुख या नवख्या उमेदवाराला रिगणात उतरवले आहे. अहमदपूर मतदारसंघात अपक्ष निवडून आलेले आमदार विनायकराव पाटील भाजपात आले होते. त्यांना भाजपाने तिकीट दिले यामुळे भाजपातील निष्ठावन्त संतप्त झाले त्यांनी बंडखोरी केली यात आयोध्याताई केंद्रे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत लढत देणार असा निर्धार केला तर दिलीप देशमुख यांनी ही मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतर ही आपण लढणारच असे स्पष्ट केले आहे. Conclusion:त्यामुळे बंडखोरीवर अंकुश घालण्यावर यश आले असले तरी काहीजण निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.