लातूर - भाजपमधील वाढती गर्दी आणि इच्छुक उमेदवारांवर होणाऱ्या संभाव्य अन्याय, यामुळे अहमदपूर पंचायत समितीच्या सभापती अयोध्याताई केंद्रे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे अंतर्गत गटबाजी आणि वाढत्या गर्दीचा फटका येथे भाजपला बसला आहे.
हेही वाचा - बिहारमध्ये पावसाचा कहर सुरूच; २९ जणांचा मृत्यू, १९ एनडीआरएफ पथके दाखल
विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. अहमदपूर मतदारसंघात भाजपकडून इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असतानाही आपल्याला उमेदवारी मिळते की नाही. यामुळे पंचायत समिती सभापती अयोध्याताई केंद्रे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अयोध्याताई केंद्रे या भाजपकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, अंतिम टप्प्यात त्यांना उमेदवारीबाबत शंका निर्माण झाल्याने त्यांनी वंचित आघाडीशी संपर्क सुरू केला होता. दरम्यान, इच्छुक म्हणून मुलाखतही दिली होती.
हेही वाचा - शोलेतील 'कालिया' काळाच्या पडद्याआड.. ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे ७८ व्या वर्षी निधन
अखेर त्यांनी भाजप पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. अहमदपूर तालुक्यात भाजपकडून इच्छुकांची गर्दी आहे. यामध्ये विद्यमान आमदार विनायक पाटील, गणेश हाके, अशोक केंद्रे, बालाजी पाटील, दिलीप देशमुख, भारत चामे यांची नावे असून उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.