ETV Bharat / state

लातूर जिल्ह्यातील दहा पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण जाहीर - Reservation for the post of Chairman of Panchayat Samiti

लातुरातील दहा पंचायत समितीच्या सभापती पदासाठीची आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात ही सोडत प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील १० पंचायत समितीपैकी ६ ठिकाणचे सभापतीपद हे महिलांसाठी राखीव असणार आहे.

Reservation has been announced for the post of Chairman of Panchayat Samiti in Latur district
लातूर जिल्ह्यातील दहा पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण जाहीर
author img

By

Published : Dec 12, 2019, 11:07 PM IST

लातूर - पंचायत समितीच्या सभापतींच्या आरक्षणाची मुदत संपत आहे. यामुळेच आगामी अडीच वर्षासाठीचे आरक्षण सोडत प्रकिया गुरुवारी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हे आरक्षण जाहीर केले. सभापतीपद कोणासाठी आरक्षित राहते, हे जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती.

लातूर जिल्ह्यातील दहा पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण जाहीर

हेही वाचा... F-16 लढाऊ विमानांचा गैरवापर केल्याने अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले

लातूर महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडीनंतर आता पंचायत समितीच्या सभापती पदाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निलंगा पंचायत समितीचे सभापतीपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव असणार आहे. रेणापूर अनुसूचित जमातीसाठी, देवणी पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार आहे. शिरूर अंतपाळ ओबीसी सर्वसाधारण, औसा ओबीसी महिलेसाठी, लातूर सर्वधसाधारण महिला, अहमदपूर अनुसूचित जाती महिला तर चाकूर सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असेल. जळकोट पंचायत समिती सभापती पद हे सर्वसाधरण गटासाठी आरक्षित असणार आहे. जिल्ह्यातील १० पंचायत समितीमध्ये ६ जागा ह्या महिलांसाठी राखीव आहेत. याबाबतचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले. आरक्षणची सोडत प्रक्रिया पार पडली असून लवकरच या निवडीच्या तारखाही जाहीर केल्या जाणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले.

हेही वाचा... यश अपयशातून उभे राहण्याची उर्जा आईकडून मिळाली - शरद पवार

अहमदपूर आणि रेणापूर जागेच्या आरक्षणाची सोडत ही अनुसूचित जातीसाठी होती. मात्र, दोन्हीपैकी एक जागा ही महिलेसाठी राखीव ठेवण्यात आली. त्यामुळे नेमकी जागा कोणती असावी, यासाठी एका लहान मुलाच्या हाताने जिल्हाअधिकारी यांच्या समोर चिठ्ठी काढण्यात आली. यावेळी चिठ्ठीत अहमदपूरचे नाव आल्याने, अहमदपूरची जागा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असणार आहे.

Intro:लातूरातील दहा पंचायत समिती सभापतींच्या आरक्षणाची सोडत
लातूर - पंचायत समितीच्या सभापतींची आरक्षण मुदत संपताच आगामी अडीच वर्षासाठीचे आरक्षण सोडत गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हे आरक्षण सोडत जाहीर केले. सभापतीपद कुणासाठी सुटते हे जाणून घेण्यासाठी इच्छूकांनी मोठी गर्दी केली होती.
Body:लातूर महानगरपालिकेतील महापौर पदाच्या निवडीनंतर आता पंचायत समितीच्या सभापती पदाकडे लक्ष लागले आहे. निलंगा पंचायत समितीचे सभापतीपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव सोडण्यात आले आहे तर रेणापूर अनुसूचित जमातीसाठी, देवणी पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी शिरूरअंतपाळ ओबीसी सर्वसाधारण, औसा ओबीसी महिलेसाठी, लातूर सर्वधसाधारण महिला, अहमदपूर अनुसूचित जाती महिला तर चाकूर सर्वसाधारण महिलेसाठी आणि जळकोट पंचायत समिती सभापती पद हे सर्वसाधरसाठी आरक्षित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १० पंचायत समितीमध्ये ६ जागा ह्या महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे याबाबतचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांना द्यावे लागले होते. आरक्षण सोडत पार पडली असून लवकरच या निवडीच्या तारखाही जाहीर केल्या जाणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले.
Conclusion:अहमदपूर- रेणापूरसाठी श्रेयसने काढली चिठ्ठी
अहमदपूर आणि रेणापूर ही जागेच्या आरक्षाची सोडत ही अनुसूचित जातीसाठी होती. मात्र, दोन्हीपैकी एक जागा ही महिलेसाठी राखव ठेवण्यात आली. त्यामुळे नेमक्या जागेसाठी श्रेयस मल्हारी रोंगे याने जिल्हाअधिकारी यांच्या समोर चिठ्ठी काढली आहे. अहमदपूर ही जागा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. आता आरक्षणाचे सोडत समोर आले आहे. लवकरच निवडीही पार पडतील.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.