ETV Bharat / state

वंचित बहुजन आघाडीचा अमित देशमुखांच्या घरावर धडक मोर्चा; पोलिसांनी रोखले - आमदार अमित देशमुख

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने बसवलेल्या नवीन वीज मिटरमुळे अधिक वीजबिल येत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्यात आंदोलन हाती घेण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने बसवलेल्या नवीन वीज मिटरमुळे अधिक वीजबिल येत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्यात अंदोलन हाती घेण्यात आले आहे.
author img

By

Published : Jul 26, 2019, 11:57 PM IST

लातूर - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने बसवलेल्या नवीन वीज मिटरमुळे अधिक वीजबिल येत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्यात आंदोलन हाती घेण्यात आले आहे. गुरुवारी (दि.२५ जुलै) रोजी पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या घरासमोर हलगी आंदोलन केल्यानंतर आज आमदार अमित देशमुख यांच्या बाभूळगाव येथील घरासमोर आंदोलन करण्यात आले. घराजवळ आंदोलनकर्ते पोहोचताच पोलिसांनी त्यांना अडवले.

अतिरिक्त वीजबिलाचा मुद्दा घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन उभे केले जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देऊन पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ग्रामपंचायत कार्यलयासमोर अडवले. वीजबिलामुळे सर्वसामान्यांचा खिसा कापला जात असल्याचे वंचितच्या नेत्यांनी सांगितले. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी याबाबत उदासीन आहेत.

वंचित बहुजन आघाडीचा अमित देशमुखांच्या घरावर धडक मोर्चा

या प्रश्नाचे गांभीर्य कळण्यासाठी आंदोलन जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या घरावर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात येत आहे. विद्युत मीटर बदलूनही समस्या कायम असल्याने ग्राहक त्रस्त आहेत.

Intro:बाईट : संतोष सूर्यवंशी (जिल्हाध्यक्ष, भारिप)
वंचितच मोर्चा आ. अमित देशमुख यांच्या गढीवर ; पोलिसांकडून अडवणूक
लातूर : वाढीव वीज ह्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्याभरात अंदोलन उभे करण्यात येत आहे. गुरुवारी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर हलगी आंदोलन केल्यानंतर आज आ. अमित देशमुख यांच्या बाभळगाव येथील घरासमोर आंदोलन करण्यात आले. घराजवळ आंदोलनकर्ते येताच पोलिसांनी त्यांची अडवणूक केली.Body:वाढीव वीज बिलाचा मुद्दा घेऊन वंचित बहुजन व भारिपच्या वतीने आंदोलन उभे केले जात आहे. वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती पार पडल्यानंतर लागलीच नागरिकांच्या जिव्हाळयाचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. विधानसभेची पूर्वतयारी सुरु झाल्याचे चित्र सध्या जिल्हयात पाहवयास मिळत आहे. काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीने वीज वितरण कार्यलयासमोर आंदोलन केले होते. काल लातूरचे पालकमंत्र संभाजी पाटील यांच्या निलंगा येथील निवासस्थान समोर आंदोलन करण्यात आले होते आज लातूर आमदार अमित देशमुख यांच्या बाभळगाव येथील घरासमोर हि आंदोलन करण्यासाठी कार्यकर्ते गेले होते. मात्र त्यांना ग्रामपंचायत कार्यलयासमोर पोलिसांनी अडवले होते. वीज बिलामुळे सर्वसामान्य लोकांच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होत आहे. मात्र लोकप्रतिनिधी या बाबत उदासीन आहेत. त्याच्या पर्यंत या प्रश्नाचे गांभीर्य जावे यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे वंचित बहुजन आघाडी कडून सांगण्यात येत आहे. विद्युत मीटर बदलूनही समस्या कायम असल्याने वीजग्राहक ट्रस्ट आहेत. Conclusion:त्यामुळे लोप्रतिनिधींनी त्वरित प्रश्न लावण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केली जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.