लातूर- देशातील वंचित हा वंचितच राहिला पाहिजे. मूलभूत सोई- सुविधांपेक्षा त्याचे इतर गोष्टींकडे लक्ष वेधू नये यासाठीच देशात मंदी लादली जातेय. 46 टक्के नागरिक हे दारिद्रय रेषेखाली असलेल्या देशात मंदी येतेच कशी ? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. मंदी वाढत असून तरुणांच्या हाताला काम नसल्यानेच चोऱ्या, आत्महत्या यासारख्या घटनांमध्ये वाढ होत असून ही वाटचाल अशांततेकडे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा-लातूरचा आमदार 'वंचित' ठरवणार; अमित देशमुखांच्या अस्तित्वाची लढाई
नागपूर येथून सुरू झालेली वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन रॅली लातूरात दाखल झाली होती. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसह सत्ताधारी भाजपावर सडकून टीका केली. विकासाच्या गप्पा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात भीषण स्थिती आहे. नामांकित कंपन्या बंद पडत आहेत. एकीकडे ओला दुष्काळ तर दुसरीकडे भीषण पाणी टंचाई असताना भाजप सरकार नेत्यांची इंकमिंग करण्यात व्यस्थ आहे. विकासाबाबत आराखडा तयार असणाऱ्यांनाच यंदा नेतृत्वाची संधी द्या. सत्तेतील वंचितचे नेतेच या वंचित समाजाला दूर सारत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने आता सावध राहून येत्या विधानसभेत आपली भूमिका बजावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांच्या भूमिकेत नाहीतर सत्तेत कसे जाता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी लातूरकरांना केले.
हेही वाचा-लातूरला रेल्वेने पाणी आणल्याचे बिल आपत्ती व्यवस्थापन विभाग भरणार- जिल्हाधिकारी
सत्ता संपादन रॅली अंबाजोगाईहुन लातूरमध्ये दाखल झाली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी रॅलीचे प्रमुख आण्णाराव पाटील यांचे स्वागत केले. तर व्यासपीठावर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारही उपस्थित होते. सत्ता संपादन रॅली वंचितचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.