ETV Bharat / state

'उदगीर जिल्हा' निर्मितीच्या हालचालींना वेग ; मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक - नांदेड लातूर विभागणीतून उदगीर जिल्हा

उदगीर जिल्हा निर्मितीच्या हालचाली वेग धरत असल्याचे दिसून येते. उदगीर, जळकोट, अहमदपूर लातूर जिल्ह्यातील हे तीन तालुके तसेच नांदेड जिल्ह्यातील लोहा, कंधार या तालुक्यांचा समावेश करत उदगीर जिल्हा निर्मिती करण्याची मागणी अनेक दिवसांपासून आहे.

Latur Collector Office
लातूर जिल्हाधिकारी कार्यालय
author img

By

Published : Jan 28, 2020, 7:45 PM IST

लातूर - गेल्या अनेक वर्षांपासून उदगीर जिल्हा निर्मितीचा मुद्दा गाजत आहे. लातूर, नांदेड या जिल्ह्यांचे विभाजन करण्याचा आणि नवीन उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी जोर धरत आहे. या संदर्भात मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत चर्चा केली. त्यानंतर याबाबतचे प्रस्ताव मागवण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे आता जिल्हा निर्मीतीच्या हालचालींना वेग आला आहे.

नांदेड आणि लातूर जिल्ह्यांच्या विभाजनातून नव्या 'उदगीर जिल्हा' निर्मितीच्या हालचालींना वेग...

हेही वाचा... माझी मेट्रो नागपूर : 'मला श्रेय नको तर, जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहे'

औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विभागीय आयुक्तांची बैठक पार पडली. यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी लातूरचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात उदगीर जिल्हा निर्मिती संदर्भातील माहिती तात्काळ देण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे. तसेच प्रशासकीय इमारतीसाठीचे काम गतिमान करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

हेही वाचा... 'हिंमत असेल तर भाजपने महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून दाखवावे'

या सर्व पार्श्वभूमीवर उदगीर जिल्हा निर्मितीच्या हालचाली वेग धरत असल्याचे दिसून येते. उदगीर, जळकोट, अहमदपूर लातूर जिल्ह्यातील हे तीन तालुके तसेच नांदेड जिल्ह्यातील लोहा, कंधार या तालुक्यांचा समावेश करत उदगीर जिल्हा निर्मिती करण्याची मागणी अनेक दिवसांपासून आहे.

उदगीर ते अहमदपूर अंतर ३२ किलोमीटर आहे. उदगीर ते जळकोट अंतर हे २५ किलोमीटर एवढे आहे. तर लोहा कंधार हे दोन तालुकेही उदगीरच्या जवळ आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर या भागातील नागरिकांना प्रशासकीय कामासाठी उदगीर हे सोयीस्कर ठिकाण होऊ शकतो. यामुळे या भागातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनीच बैठक घेतल्याने हालचालींना वेग आला आहे.

Intro:उदगीर जिल्हा निर्मितीसंदर्भातल्या हालचालींना वेग ; मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक
लातूर : गेल्या अनेक दिवसांपासून उदगीर जिल्हा निर्मितीचा मुद्दा गाजत आहे. वाढती बाजारपेठ आणि जिल्ह्याचे विभाजन यामुळे जिल्हा निर्मितीच्या मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात गतआठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे बैठकीत या मुद्याची चर्चा केली आणि याबाबतचे प्रस्ताव मागून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे.
Body:औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विभागीय आयुक्तांची बैठक पार पडली. यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी लातूरचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवलं आहे. पत्रात उदगीर जिल्हा निर्मिती संदर्भातील माहिती तात्काळ देण्यासंदर्भात सांगण्यात आला आहे तसेच प्रशासकीय इमारतीसाठी च काम गतिमान करण्याच्या सूचनाही आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उदगीर जिल्हा निर्मितीच्या हालचाली वेग धरत असल्याचे दिसून येते. उदगीर, जळकोट, अहमदपूर लातूर जिल्ह्यातील हे तीन तालुके तसेच नांदेड जिल्ह्यातील लोहा, कंधार या तालुक्यांचा समावेश करत उदगीर जिल्हा निर्मिती करण्याची मागणी अनेक दिवसापासूनची आहे. उदगीर ते अहमदपूर अंतर ३२ किलोमीटर आहे उदगीर ते जळकोट अंतर हे २५ किलोमीटर एवढे आहे तर लोहा कंधार हे दोन तालुके ही उदगीरच्या जवळ आहेत या सर्व पार्श्वभूमीवर या भागातील नागरिकांना प्रशासकीय कामासाठी उदगीर हे सोयीस्कर ठिकाण होऊ शकतो. यामुळे या भागातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. Conclusion:यासंदर्भात मुख्यमंत्री यांनीच बैठक घेतल्याने हालचालींना वेग आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.