लातूर - जिल्ह्यात 408 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या होत्या. पैकी 25 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या असल्याने आता 383 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली जाणार आहे.
कोरोनाचे संकट दूर होत असल्याने आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत आहेत. बुधवारी सायंकाळी प्रचार थंडावला असून शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी शासकीय कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण करून गुरुवारी हे कर्मचारी कर्तव्य बजावण्यासाठी दाखल झाले आहेत. 6 लाख 72 हजार मतदारांची नोंद असून हे मतदार मतदानाचा हक्क बाजवणार आहेत. याकरिता 1 हजार 459 केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. याकरिता 3 हजार 173 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्र अधिकारी तसेच कर्मचारी गुरुवारी सायंकाळीच मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत.
कडेकोट बंदोबस्त -
संवेदनशील आणि अतिसंवेदनशील केंद्रावर पोलिसांची करडी नजर राहणार आहेत. दोन दिवसांपूर्वी यानुषंगाने बैठक पार पडली होती. शासकीय कर्मचारी यांच्यासह पोलीस अधिकारी-कर्मचारी हे देखील केंद्रावर दाखल झाले आहेत.