ETV Bharat / state

मॉर्निंग वॉकला निघालेले नागरिक पोलीस ठाण्यात पोहोचले, 40 जणांवर करवाई

15 दिवसाच्या लॉकडाऊननंतर नगरपालिका आणि नगर परिषद या ठिकाणी काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली तरी लातूर शहरात लॉकडाऊन कायम आहे. एवढेच नाही तर नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

police action on morning walk citizen at latur

author img

By

Published : Aug 2, 2020, 12:51 PM IST

लातूर - शहर वगळता जिल्ह्यात लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता करण्यात आली आहे. शहरात 15 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश असतानाही नागरिक मॉर्निंग वॉकसाठी सकाळच्या प्रहरी रस्त्यावर येत आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी मॉर्निंग वॉकसाठी रस्त्यावर आलेले नागरीक थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. 40 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हे दाखल केले आहेत.

लातूर शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. 15 दिवसाच्या लॉकडाऊनंतर नगरपालिका आणि नगर परिषद या ठिकाणी काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली तरी लातूर शहरात लॉकडाऊन कायम आहे. एवढेच नाही तर नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

रविवारी शिवाजी नगर ठाणे हद्दीत मॉर्निंग वॉकला आलेल्या 40 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी लॉकडाऊन 1 च्या दरम्यानही या पोलीस ठाण्यांतर्गत सुमारे 120 जणांवर कारवाई करण्यात आली होती. सातत्याने आवाहन करूनही नागरिक रस्त्यावर येत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार, राजेश घाडगे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी औसा रोड, अंबाजोगाई रोडवर फिरायला जाणाऱ्या नागरिकांवर ही कारवाई केली आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ही वाढती साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी यावेळी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.