ETV Bharat / state

पार्किंगवर कायमचा तोडगा निघाल्याने गंजगोलाईने घेतला मोकळा 'श्वास' - सोशल डिस्टन्स

लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच या भागात वाहनांची पार्किंग आणि नागरिकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. सोशल डिस्टन्सच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने आवाहन केले जात होते. मात्र आता गोलाईत येणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत.

ganj
गांजगोलाई
author img

By

Published : May 18, 2020, 2:55 PM IST

लातूर - शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली गंजगोलाई ही कायम गजबजलेली असते. लॉकडाऊनच्या शिथिलतेत या भागात वाहनांची आणि नागरिकांची वाढती वर्दळ लक्षात घेता यावर मनपा आणि पोलीस प्रशासनाने कायमचा तोडगा काढला आहे. गंजगोलाईत येणारे 18 अंतर्गत रस्त्यावर कायमचे बॅरिगेट्स लावण्यात आले असून रहदारी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी याचा परिणाम पाहायला मिळाला असून गंजगोलाईने मोकळा श्वास घेतला आहे.

शहराच्या कोणत्याही भागातून गंजगोलाईत मार्गस्थ होता येते. शिवाय शहरासह जिल्ह्याचे मार्केट या परिसरात आहे. त्यामुळे या भागात कायम वर्दळ असते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच या भागात वाहनांची पार्किंग आणि नागरिकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. सोशल डिस्टन्सच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने आवाहन केले जात होते.

पार्किंगवर कायमचा तोडगा निघाल्याने गंजगोलाईने घेतला मोकळा 'श्वास'

शिवाय प्रत्येक व्यावसायिकाला ठरवून दिलेल्या दिवशीच दुकान खुले करण्याची परवानगी देण्यात आली होती. असे असतानाही गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली असून गोलाईत येणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. शिवाय गोलाईपासून 300 मीटर अंतरावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. बॅरिगेट्स कायमस्वरूपी राहणार असल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या सूचनेनुसार ही उपाययोजना केल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी सांगितले आहे.

किमान लॉकडाउनच्या अंमलबजावणीमुळे का होईना, या मुख्य बाजारपेठतील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागला आहे. हीच व्यवस्था कायम राहावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.