ETV Bharat / state

कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचाऱ्याला टेम्पोने चिरडले - road

कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला आयशर टेम्पोने धडक दिली. यात पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

मृत नागेश चौधरी
author img

By

Published : Feb 13, 2019, 4:05 PM IST

लातूर - कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला आयशर टेम्पोने धडक दिली. यात पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास लातूर - नांदेड महामार्गावर घरणी गावाजवळ घडली. या प्रकरणी टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नागेश चौधरी असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पोलीस नाईकपदी कार्यरत होते. आज सकाळी नागेश लातूर - नांदेड या महामार्गावर जड वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एम.एच. ०३ सी. पी ३४५० या भरधाव टेम्पोने त्यांना पळून जाण्याच्या उद्देशाने धडक दिली.

नागेश हे रोडवर जखमी पडले असताना टेम्पो चालकाने त्यांच्या अंगावर टेम्पो घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये नागेश चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. या प्रकरणी टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Intro:Body:

कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचाऱ्याला टेम्पोने चिरडले

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.