ETV Bharat / state

लातुरात पाणी टंचाईची झळ वन्यप्राण्यांनाही; पाण्याच्या शोधात खवले मांजर मानवी वस्तीला - latur

एकूणच उन्हाच्या तीव्रतेमुळे वन्यजीव हे मानवी वस्तीकडे येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी वन विभागातर्फे करण्यात आले.

पाण्याच्या शोधात खवले मांजर मानवी वस्तीला
author img

By

Published : Apr 26, 2019, 5:03 PM IST

लातूर - जिल्ह्यात एकीकडे सूर्य आग ओकत आहे, तर दुसरीकडे पाण्याच्या शोधात वन्यजीव हे मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसून येत आहेत. रेणापूर तालुक्यातील खलंग्री-माकेगावच्या शिवारात पाण्याच्या शोधात एक दुर्मिळ वन्यजीव आढळले. हा नेमका कोणता प्राणी आहे, हे सुरुवातीला ग्रामस्थांच्या लक्षातच आले नाही. त्यानंतर प्राणी मित्रांना विचारणा केली असता, हे खवले मांजर असल्याचे समजले.

पाण्याच्या शोधात खवले मांजर मानवी वस्तीला

सध्या जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे नागरिकांना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शिवाय वन्य प्राणीही पाण्याच्या शोधात आहेत. जिल्ह्यात खवले मांजर हे अतिशय दुर्मिळ आहेत. या मांजराला तहान लागल्यामुळे ते पिण्याच्या पाण्याच्या शोधात खलंग्री-माकेगावच्या शिवारात आले असण्याची शक्यता यावेळी प्राणी मित्रांनी व्यक्त केली.

खलंग्री-माकेगावच्या ग्रामस्थांनी माणुसकीचे दर्शन घडवत त्या खवल्या मांजराला पाणी पाजले. त्यानंतर ग्रामस्थांनी याची सूचना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. काही वेळानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना हे खवले मांजर सुपूर्द करण्यात आले.

Intro:बाईट :- राम नागरगोजे, ग्रामस्थ - खलंग्री, ता. रेणापूर,
पाणीटंचाईची झळ वन्यप्राण्यानांही : पाण्याच्या शोधात खवले मांजर मानवस्तीमध्ये
लातूर : जिल्ह्यात एकीकडे सुर्य आग ओकत आहेत तर दुसरीकडे पाण्याच्या शोधात वन्यजीव हे मानवी वस्तीकडे येत आहेत. रेणापूर तालुक्यातील खलंग्री- माकेगावच्या शिवारात पाण्याच्या शोधात एक दुर्मिळ वन्यजीव आढळले. हा नेमका कोणता प्राणी आहे हे सुरुवातीला ग्रामस्थांच्या लक्षातच आले नाही. त्यानंतर प्राणी मित्रांना विचारणा केली असता हे खवले मांजर असल्याचे समजले.
Body:सध्या जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. नागरिकांची तर पाण्यासाठी भटकंती होत आहेच शिवाय वन्य प्राणीही पाण्याच्या शोधात आहेत. जिल्ह्यात खवले मांजर हे अतिशय दुर्मिळ आहेत. या मांजराला तहान लागल्यामुळे ते पिण्याच्या पाण्याच्या शोधात खलंग्री- माकेगावच्या शिवारात आले असण्याची शक्यता यावेळी प्राणी मित्रांनी व्यक्त केली. खलंग्री- माकेगावच्या ग्रामस्थांनी माणुसकीचे दर्शन घडवीत त्या खवल्या मांजराला पाणी पाजले. त्यानंतर ग्रामस्थांनी याची सूचना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. काही वेळानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना हे खवले मांजर सुपूर्द करण्यात आले. Conclusion:एकूणच उन्हाच्या तीव्रतेमुळे वन्यजीव हे मानवी वस्तीकडे येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी वन विभागातर्फे करण्यात आले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.