ETV Bharat / state

कोरोना लढ्यात महिलांचा सहभाग, मास्क निर्मितीतून ३०० बेरोजगार महिलांना मदत

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारीसाठी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले आहे. त्यातच बाजारात मास्कचा तुटवडा आणि वाजवी किंमत पाहता निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या सुचनेवरुन उमेद बचतगटांच्या प्रशिक्षित महिलांच्या माध्यमातून अत्यंत अल्प दरात कपड्यांपासून मास्क निर्मितीचे काम हाती घेण्यात आले.

कोरोना लढ्यात महिलांचा सहभाग
कोरोना लढ्यात महिलांचा सहभाग
author img

By

Published : Apr 21, 2020, 2:54 PM IST

Updated : Apr 21, 2020, 3:01 PM IST

लातूर - वाढत्या कोरोना संसर्गामुळे एकिकडे शहरी भागात मास्कचा तुटवडा जाणवत असताना निलंगा तालुक्यातील बचतगटांच्या महिलांनी लॉकडाऊन काळातही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत मास्क निर्मितीचे काम हाती घेऊन सामाजिक दायित्व जपले आहे.

मास्क निर्मितीतून ३०० बेरोजगार महिलांना मदत

जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण रोखण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर विविध उपाययोजना सुरू आहेत. यासाठी गावस्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत विविध संस्था, संघटना, सेवाभावी संस्था व शासकीय यंत्रणांकडून कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी समाजात जनजागृती केली जात आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारीसाठी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले आहे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच बाजारात मास्कचा तुटवडा आणि वाजवी किंमत पाहता निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या सुचनेवरुन उमेद बचतगटांच्या प्रशिक्षित महिलांच्या माध्यमातून अत्यंत अल्प दरात कपड्यांपासून मास्क निर्मितीचे काम हाती घेण्यात आले.

तालुक्यातील हलगरा, नदीहत्तरगा, हाडगा, सावरी, होसुर, नणंद, शिवणी कोतल, धानोरा, तगरखेडा, लिंबाळा येथील जवळपास २१ महिला बचतगटाचा समुह सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत युध्दपातळीवर मास्क निर्मितीचे काम करत आहे. आत्तापर्यंत जवळपास ४० हजार मास्कची निर्मिती या महिलांनी केली आहे. लॉकडाऊनच्या काळातही सेवेत असलेल्या तहसील कार्यालय, बँका, एमआयडीसी व पोलीस कर्मचारी यांना मोफत मास्कचे वाटपही करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी ताकभाते यांनी मास्क निर्मिती करणासाठी या महिलांना प्रोत्साहित केले. तर, आता त्यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांना गटांच्या महिलांमार्फत तयार केलेले मास्क खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. गटविकास अधिकारी यांच्या अवहानाला प्रतिसाद देत अनेक गावच्या ग्रामपंचायतकडून गटांच्या महिलांना मास्कची मागणी येताना दिसत आहे.

Last Updated : Apr 21, 2020, 3:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.