ETV Bharat / state

मुलाच्या अवयवदानावेळी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता नाही; पालकांचे आंदोलन

सप्टेंबर २०१७ मध्ये किरण लोभे याचा अपघात झाला होता. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्या जगण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे डॉक्टरांनी अवयवदान करण्याचा सल्ला दिला होता. लोभे कुटुंबीयांनी हा सल्ला मान्य करत अवयवदान केले.

आंदोलक
author img

By

Published : Apr 20, 2019, 1:58 PM IST

लातूर - अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाची जगण्याची शक्यता कमी असल्याने डॉक्टरांनी अवयवदानाचा सल्ला कुटुंबीयांना दिला. पण, अवयवदान करुनही दिली गेलेली आश्वासने प्रशासनाकडून पाळली गेली नाहीत. मुलाचे अवयवदान कुणाला करण्यात आले ते सांगण्यात आले नाही, असा आरोप करत लातुरातील लोभे कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांनी मतदानावर सुद्धा बहिष्कार घातला.

मृत किरण लोभेची आई

सप्टेंबर २०१७ मध्ये किरण लोभे याचा अपघात झाला होता. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्या जगण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे डॉक्टरांनी अवयवदान करण्याचा सल्ला दिला होता. लोभे कुटुंबीयांनी हा सल्ला मान्य करत अवयवदान केले. पण दीड वर्षानंतरही अवयवदान कुणाला करण्यात आले हे लोभे कुटुंबीयांना सांगण्यात आले नाही. त्यामुळे आंदोलनाचा मार्ग लोभे कुटुंबाने स्वीकारला आहे. प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांनी देखील त्यांना साथ देण्याचे ठरवले आहे.

उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाला का? याची चौकशी केली जाणार होती. शिवाय घरातील एकास नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, असे काहीच न झाल्याचा आरोप किरण लोभे यांच्या आईने केला आहे. त्याच्या निषेधार्थ या प्रभागातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालून महानगरपालिकेसमोर आंदोलन सुरू केले आहे.

Intro:न्याय नाही झाला आवायदानाचा मग कशाला हक्क बाजवायचा मतदानाचा
लातूर : अपघातामध्ये मुलगा गंभीर जखमी आणि मृत्यूच्या दाढेतून बाहेर येणार नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर त्याच्या अवयवदानाचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याने दान केलेले अवयव कुणासाठी वापरले... शिवाय त्यावेळी देण्यात आलेल्या एकही अश्वसनाची पूर्तता प्रशासनाकडून करण्यात आली नाही... त्यामुळे माझ्या पोटच्या गोळ्याला मृत्यूनंतरही न्याय मिळाला नाही तर कशासाठी करायचे मतदान.. ही आर्त हाक आहे मातेची. या मातेच्या हाकेला साथ देत शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांनीही पाठिंबा दिला असून मतदानावर बहिष्कार घातला आहे.
Body:सप्टेंबर 2017 मध्ये किरण लोभे याचा अपघात झाला होता. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने आता प्रयत्न करणेही व्यर्थ असल्याचे सांगितल्याने त्याच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला होता. मात्र, दीड वर्षानंतरही किरण लोभे यांच्या कुटुंबियांना देण्यात आलेली अश्वसने पाळण्यात आली नाहीत. त्याच्या अवयवाचे रोपण करून ज्या रुग्णाला जीवदान मिळाले आहे. त्या रुग्णाची आणि लोभे कुटुंबियाला भेट घालून देण्यात येणार होती. उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाला का याची चौकशी केली जाणार होती शिवाय घरातील एकास नौकरी देण्याचे आश्वासन देण्यात। आले होते परंतु असे काहीच न झाल्याने किरण लोभे यांच्या आईनी आरोप केला आहे. त्याच्या निषेधार्थ या प्रभागातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालून महानगरपालिकेसमोर आंदोलन सुरू केले आहे. Conclusion:जिल्हा प्रशासनाने मदत करण्याची मागणी यावेळी उपस्थतानी केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.