ETV Bharat / state

लातुरात रेल्वेने पाणी आणल्याचे बील पालिकेच्या माथी, मदत केल्याचे बील कसे मागता - आमदार अमित देशमुख

2016 मध्ये लातूर शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी रेल्वेने लातूरला पाणी पुरवत शहराची पाणी टंचाई सोडवण्यासाठी हातभार लावला होता. मात्र, संकटकाळी केलेल्या या पाणी पुरवठ्याच्या मदतीबद्दल आता रेल्वे विभागाने लातूर महानगरपालिकेला जवळपास ९ कोटी ९० लाख रुपयांचे बिल पाठवले आहे. या मदतीचे बिल कसे असू शकते, असा प्रश्न उपस्थित करून कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिका हे बिल भरणार नाही, रेल्वेला पैसे हवे असतील तर ते शासनाने द्यावेत, असेही आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.

अमित देशमुख
author img

By

Published : Sep 7, 2019, 8:18 PM IST

Updated : Sep 7, 2019, 8:32 PM IST

लातूर - रेल्वेने लातूरला केलेल्या पाणी पुरवठ्याचे जवळपास १० कोटी रुपयांचे बिल रेल्वे विभागाने लातूर महानगरपालिकेला पाठवले आहे. हे म्हणजे ‘दुष्काळात तेरावा महिना’ आहे. त्यामुळे नियोजन शून्य करून गाजावाजा करणाऱ्यांनीच बिल अदा करावे, असा टोला आमदार अमित देशमुख यांनी लगावला.

रेल्वेने लातूर महापालिकेला पाठवलेल्या बिलाबाबत प्रतिक्रिया देताना आमदार अमित देशमुख

२०१६ मधील भीषण दुष्काळात लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली होती. यावेळी शासनाने मोठा गाजावाजा आणि जाहिरातबाजी करून लातूरला रेल्वेने पाणी आणले. भाजपकडून आजही त्या गोष्टीचे भांडवल केले जात आहे. वास्तविक अनेक सामाजिक संघटना, शिक्षण संस्था यांनी स्वंयस्फुर्तीने लातुरात पाणीपुरवठा केला. रेल्वेचेही पाणी मिळाले त्याबद्दल लातूरकरांनी सर्वांचे आभार मानले होते. संकटकाळी केलेल्या या पाणी पुरवठ्याच्या मदतीबद्दल आता रेल्वे विभागाने लातूर महानगरपालिकेला जवळपास ९ कोटी ९० लाख रुपयांचे बिल पाठवले आहे.

यावर्षी अर्धा पावसाळा संपत आलेला असताना पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पुन्हा पाणी संकट उभे राहिले आहे. या परिस्थितीत रेल्वे विभागाने १० कोटींचे बिल पाठविणे म्हणजे दुष्काळात तेराव महिना असाच प्रकार आहे. वास्तविक त्यावेळी रेल्वेचा पाणीपुरवठा हा मदतीचा भाग होता. या मदतीचे बिल कसे असू शकते? असा प्रश्न उपस्थित करून कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिका हे बिल भरणार नाही, रेल्वेला पैसे हवे असतील तर ते शासनाने द्यावेत, असेही आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.

Intro:पाणी आणल्याचा गाजावाजा करणाऱ्यांनीच रेल्वेचे बिल अदा करावे : अमित देशमुख
लातूर : रेल्वेने लातूरला केलेल्या पाणी पुरवठयाचे जवळपास १० कोटी रूपयाचे बील रेल्वे विभागाने लातूर महानगरपालीकेला पाठवले आहे, हे म्हणजे ‘दुष्काळात तेरावा महिना’ आहे. त्यामुळे नियोजन शून्य करून गाजावाजा करणाऱ्यांनीच बिल अदा करावे असा टोला आ. अमित देशमुख यांनी लगावला आहे.Body:२०१६ मधील भिषण दुष्काळात लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली होती. यावेळी शासनाने मोठा गाजावाजा आणि जाहिरातबाजी करून लातूरला रेल्वेने पाणी आणले, भाजपाकडून आजही त्या गोष्टीचे भांडवल केले जात आहे. वास्तविक पहाता अनेक सामाजिक संघटना, शिक्षण संस्था यांनी स्वंयस्फुर्तीने लातूरात पाणीपुरवठा केला, रेल्वेचेही पाणी मिळाले त्याबददल लातूरकरांनी सर्वाचे आभार मानले होते. संकटकाळी केलेल्या या पाणी पुरवठयांच्या मदती बददल आता रेल्वे विभागाने लातूर महानगरपालीकेला जवळपास ९ कोटी ९० लाख रुपयाचे बील पाठवले आहे. यावर्षी अर्धा पावसाळा संपत आलेला असतांना पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पुन्हा पाणी संकट उभे राहीले आहे. या परिस्थितीत रेल्वे विभागाने १० कोटीचे बील पाठविणे म्हणजे दुष्काळात तेराव महिना असाच प्रकार आहे. Conclusion:वास्तवीक त्यावेळी रेल्वेचा पाणीपुरवठा हा मदतीचा भाग होता. या मदतीचे बील कसे असू शकते असा प्रश्न उपस्थित करून कोणत्याही परिस्थितीत महानगरपालीका हे बील भरणार नाही, रेल्वेला पैसे हवे असतील तर ते शासनाने द्यावेत असेही आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.
Last Updated : Sep 7, 2019, 8:32 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.