ETV Bharat / state

लातुरात कार झाडावर आदळली.. मित्राच्या लग्नासाठी आलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू

author img

By

Published : Dec 3, 2019, 5:25 PM IST

बालाजी हा देवणी तालुक्यातील वलांंडीला मित्राच्या लग्नासाठी गावाकडे आला होता. लग्न लागल्यानंतर मित्राला भेट वस्तू घेण्यासाठी तो वलांडीला आला. तेथून तो बहिणीला भेटण्यासाठी जात असता जवळगा साकोळ दरम्यान त्याची कार एका झाडावर आदळली.

one-dead-in-car-accident-in-latur
लातुरात कार झाडाला आदळून तरूणाचा जागीच मृत्यू

लातूर- मित्राच्या लग्नासाठी पुण्याहून गावाकडे आलेल्या तरूणाचा काल (सोमवारी) अपघात झाला. यात तरूणाची कार झाडावर जोराने आदळ्याने तरूणाचा जागीच मृत्यू झाला. बालाजी दिंगबर भोसले (वय २५ रा. बोंबळी) असे तरूणाचे नाव आहे.

हेही वाचा- एक वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टबमध्ये बुडून मृत्यू

बालाजी हा देवणी तालुक्यातील वलांंडीला मित्राच्या लग्नासाठी गावाकडे आला होता. लग्न लागल्यानंतर मित्राला भेट वस्तू घेण्यासाठी तो वलांडीला आला. तेथून तो बहिणीला भेटण्यासाठी जात असता जवळगा साकोळ दरम्यान त्याची कार (एम.एच १२ केडब्ल्यू ५५८५) एका झाडावर जावून आदळली. यात तो जागीच ठार झाला. मृत बालाजी भोसले यांच्या मागे आई-वडील, भाऊ, तीन बहिणी, असा परिवार आहे. या घटनेमुळे बोंबळी गावात हळहळ व्यक्त केली जात असून या दुःखद घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Intro:बहिणीची भेट घेण्यासाठी निघालेल्या भावावर काळाचा घाला कारझाडावर धडकून जागीच ठार बहिणीची गळा भेट आधुरी.. Body:कार अपघातात युवक जागीच ठार
बहिणीची भेट आधुरीच...

देवणी तालुक्यातील वलांंडीला ःमित्राच्या लग्नासाठी गावाकडे आलेला होता. बहिणीच्या भेटीसाठी निघाला असता झालेल्या कार अपघातात सदर तरुण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.
बालाजी दिंगबर भोसले वय २५ वर्षे रा बोंबळी (खु)असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
गावातील मित्राच्या लग्नासाठी पुण्याहुन आज सकाळीच आला होता.लग्न लागल्यानंतर मित्राला गिफ्ट घेण्यासाठी वलांडीला आला होता.दुकानात भेटवस्तु घेवुन पँकींग करण्यासाठी सांगुन अजनी ता.शिरुर अनंतपाळ येथील बहिणीला भेटुन येण्यासाठी जात असताना जवळगा साकोळ दरम्यान कार एम.एच १२ केडब्ल्यु ५५८५ एका झाडावर जावुन आदळली .या अपघातात जो जागीच ठार झाला.कारचा अपघात भीषण होता.कारचा चक्काचुर झाला.एअरबँग उघडी होवुनही युवकास प्राणास मुकावे लागले.सदर मयत युवकास शवविच्छेदनासाठी साकोळ येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले .
मयत बालाजी भोसले यांच्या पश्च्यात आई वडील ,भाऊ ,तीन बहिणी असा परिवार आहे.Conclusion:या घटनेमुळे बोंबळी गावात हळहळ व्यक्त केली जात असून या दुःखद घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.