ETV Bharat / state

Coronavirus : 8 बाधित रूग्ण आढळल्यानंतर निलंगा 17 एप्रिलपर्यंत सील - कोरोना विषाणू बातमी

नागरिकांना जीवनावश्यक सेवा, आरोग्य सेवा निलंगा नगर परिषद प्रशासनाकडून दिल्या जात असल्याची माहिती नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे यांनी दिली आहे.

Nilanga seals until April 17th
निलंगा 17 एप्रिलपर्यंत सील
author img

By

Published : Apr 5, 2020, 3:51 PM IST

निलंगा - शहरातील एका धार्मिक स्थळी वास्तव्यास आलेल्या १२ परप्रांतीयांपैकी आठ जणांना कोरोनाची लागण झालेली असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. उपविभागिय महसूल अधिकारी डॉ. विकास माने यांनी शनिवारी निलंगा शहर 17 एप्रिलपर्यंत सील करण्याचे आदेश दिले आहेत.

नागरिकांना जीवनावश्यक सेवा, आरोग्य सेवा निलंगा नगर परिषद प्रशासनाकडून दिल्या जात असल्याची माहिती नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे यांनी दिली आहे. त्याबरोबरच अत्यावश्यक सेवेबाबत काही अडचण आल्यास पालिका प्रशासनाशी संपर्क करण्याचे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.

कोरोनाच्या 8 पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्यामुळे 10 वैद्यकीय टीम तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी एक टीम 80 कुटुंबातील व्यक्तींची वैद्यकीय चाचणी करून अहवाल देणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने 6 जणांना होम-क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.