ETV Bharat / state

सासरच्या जाचाला कंटाळून कासार शिरसी वाडीत नवविवाहित महिलेची आत्महत्या - कासार शिरसी पोलीस न्यूज

नवीन दुकान सुरु करण्यासाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी वारंवार होणाऱ्या जाचाला कंटाळून कासार शिरसी वाडीत नवविवाहित महिलेने आत्महत्या केली. रेश्मा मंडले हिने राहत्या घरी गळफास घेतला. कासार शिरसी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

newly married woman suicide
कासार शिरसीवाडीत नवविवाहित महिलेची आत्महत्या
author img

By

Published : Jun 19, 2020, 3:55 PM IST

निलंगा(लातूर)-नवीन दुकान सुरु करण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये अन्यथा माझ्या घरात राहू नको, असा तगादा सासरच्या व्यक्तींनी लावल्याने नवविवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. निलंगा तालुक्यातील कासार शिरसीवाडी येथील नवविवाहित रेश्मा कुमार मंडले (वय १९ वर्षे) या महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

शिरसीवाडी येथील कुमार शिवाजी मंडले, शिवाजी हणमंत मंडले, वायम्मा शिवाजी मंडले, लक्ष्मीबाई उमेश मंडले, सकूबाई अंकुश मंडले सर्व राहणार शिरसीवाडी यांनी नवीन दुकान सुरु करण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये अन्यथा घरात राहू नको, अशा प्रकारे रेश्मा हिला मानसिक व शारीरिक त्रास दिला. मानसिक त्रास देणे आणि उपाशीपोटी ठेवणे याद्वारेआत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा यासर्वांविरोधात कासार शिरसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हुंड्याची राहिलेली रक्कम व नवीन दुकान सुरु करण्यासाठी मुलीच्या सासरचे पैसे मागत होते. आम्ही पैसे दिले नाही यामुळे माझ्या मुलीचा गळा दाबून खून केला, अशी तक्रार कासार शिरसी पोलीस ठाण्यात नवविवाहितेचे वडील रविंद्र काशाप्पा आडपगौळ रा. कोहिनूरवाडी ता.बस्वकल्याण जि.बिदर,कर्नाटक यांनी दिली आहे.

रेश्मा मंडलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आले. यानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक पी.ए. गरजे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.