निलंगा (लातूर) - निलंगा नगर परिषद अंतर्गत शिवाजी नगर, प्रभाग 5, वार्ड 16 मधील सार्वजनिक मुस्लिम कब्रस्तानमध्ये शहरातील नालीचे घाण पाणी जात आहे. त्यामुळे अस्वच्छता पसरुन असून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. या पवित्र कब्रस्तानची होत असलेली विटंबना त्वरित थांबवा. तसेच कब्रस्तानचे राहिलेले काम त्वरीत पूर्ण करावे अन्यथा ५ जुलैला समस्त मुस्लिम समाजातर्फे निलंगा नगर पालिकासमोर अशुद्धीकरण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यास समस्त नगर पालिका व प्रशासन जबाबदार राहील, अशा मागणीचे निवेदन मुस्लीम समाजातर्फे उपविभागीय अधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
यावेळी मुजीब सौदागर, इस्माईल शेख, मुजम्मील कादरी, झारेकर मज्जीद, शेख शादुल, शेख हुसेन, उमर फारुख औसेकर, महेबूब बागवान, नसीम तांबोली, शेख सोहेल, चांद शेख, इस्माईल तांबोली उपस्थित होते.