ETV Bharat / state

रितेशने दिला वडिलांच्या आठवणींना उजाळा; आई वैशाली देशमुख भावूक - रितेश देशमुख

रितेश देशमुख यांनी वडील विलासराव देशमुख यांच्या आठवणी सांगताच वैशालीताई या भावनिक झाल्याचे पहायला मिळाले. बाभळगावात होणारा हा दसरा मेळावा विलासराव देशमुखांनी कधीही चुकवला नाही. हीच परंपरा आजही कायम आहे.

रितेश देशमुख
author img

By

Published : Oct 9, 2019, 3:16 PM IST

लातूर - परंपरेप्रमाणे यंदाही लातूरतील बाभळगावत दसरा महोत्सव पार पडला. देशमुख कुटुंबातील आ. अमित देशमुख, धीरज देशमुख आणि रितेश देशमुख हे या मेळाव्याला आई वैसाली देशमुख यांच्यासह उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या जन्मभूमीतील आठवणींना उजाळा दिला. रितेश देशमुख यांनी वडील विलासराव देशमुख यांच्या आठवणी सांगताच वैशालीताई या भावनिक झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, निवडणुकीच्या काळातदेखील या मेळाव्यात राजकीय भाष्य करणे या भावांनी टाळले.

रितेशने दिला वडीलांच्या आठवणींना उजाळा

बाभळगावात हेणारा हा दसरा मेळावा विलासराव देशमुखांनी कधीही चुकवला नाही. हीच परंपरा आजही कायम आहे. यानिमित्ताने आज अमित, रितेश आणि धीरज यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ज्या मातीत आम्ही घडलो ती मातीच वेगळी आहे. या गावच्या ग्रामस्थांच्या आशीर्वादाने आज देशमुख कुटुंबातील प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उपस्थित मान्यवरांनीही दसऱ्यानिमित्त विलासराव देशमुख असतानाच्या आठवणींना उजाळा दिला.

हेही वाचा - विधासभेच्या निवडणुकांमध्ये महाआघाडीचेच वर्चस्व राहणार; अमित देशमुखांना विश्वास

यावेळी आ. अमित देशमुख म्हणाले, "बाभळगावत चर्चा होत असेल की वाड्यावर काय चाललंय. पण वाड्यावर दुसरं-तिसरं काही नाही तर बाभळगावच्या विकासाबाबत विचारमंथन वाड्यावर ज्याप्रमाणे आमचा हक्क आहे प्रत्येकाचा आहे"

Intro:रितेश विलासरावांच्या आठवणींना उजाळा देत होता अन त्यांच्या आई अश्रूंना वाट मोकळी करून देत होत्या...
लातूर : परंपरेप्रमाणे यंदाही लातूरतील बाभळगावत दसरा महोत्सव पार पडला. मात्र, या दसऱ्यामध्ये बाभळगावत वेगळेच वातावरण होते. देशमुख कुटुंबातील आ. अमित देशमुख, धीरज देशमुख आणि रितेश देशमुख हे या जन्मभूमितील आठवणींना उजाळा देत होते. प्रत्येकांच्या आठवणीतील विलासराव देशमुख यांचा विषय येताच बाभळगावतील ग्रामस्थ भावनिक तर वैशालिताई देशमुख या तर आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होत्या. रितेश देशमुख यांनी वडील विलासराव देशमुख यांच्या आठवणी सांगताच वैशालिताई यांना भावनांना आवर घालताच आली नाही. तर सध्याच्या निवडणुकीच्या काळात देखील या मेळाव्यात राजकीय भाष्य करणे या भावांनी टाळले.

Body:बाभळगावत दसरा मेळाव्याला एक परंपरा आहे. विलासराव देशमुख यांनी हा दसरा मेळावा कधीही चुकवला नाही. त्यामुळेच निवडणुकीची सभा नाही पण या मेळाव्याच्या अनुषंगाने विचारांची देवाणघेवाण होते. हीच परंपरा आजही कायम आहे. यानिमित्ताने आज अमित देशमुख, रितेश देशमुख, धीरज देशमुख यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ज्या मातीत आम्ही घडलो ती मातीच वेगळी आहे. या गावच्या ग्रामस्थांच्या आशीर्वादाने आज देशमुख कुटुंबातील प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवत असल्याची भावना व्यक्त केली. उपस्थित मान्यवरांनीही आज या दसऱ्यानिमित्त विलासराव देशमुख असतानाच्या दसरा...त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला.

गढीवर काय चाललंय याची चर्चा आता होतेय पण....
बाभळगावत देखील ही चर्चा होत असेल की वाड्यावर काय चाललंय.... पण वाड्यावर दुसरं- तिसरं काही नाही तर बाभळगावच्या विकासाबाबत विचारमंथन होत असल्याचे आ. अमित देशमुख यांनी सांगितले. ज्याप्रमाणे आमच्यासाठी हा वाडा आहे त्याप्रमानातच प्रत्येकाचा हक्क येथे असल्याचे त्यांनी नमूद केले.

Conclusion:बाभळगावतील या दसरा मेळाव्यात बाभगवसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.