ETV Bharat / state

पोलिसांचे हात बांधल्यामुळे अशा दुर्दैवी घटना.. अजून किती लोकांचे जीव घेणार, आमदार निलंगेकरांचा सरकारला सवाल

पोलिसांचे हात बांधल्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. अजून किती लोकांचे जीव घेणार, असा सवाल आमदार निलंगेकर यांनी राज्य सरकारला केली आहे.

MLA Nilangekar criticizes the state government
निलंगा दुहेरी हत्याकांडावरून आमदार निलंगेकरांचा सरकारला सवाल
author img

By

Published : May 25, 2020, 3:31 PM IST

लातूर - केवळ गावात फिरू नको म्हटल्यावरून वाद झाला आणि त्याचे रुपांतर मोठ्या भांडणात होऊन दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना घडली ती फक्त पोलीस प्रशासनाचे हात सरकारने बांधल्यामुळे झाली आहे, अशी टीका आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

निलंगा दुहेरी हत्याकांडावरून आमदार निलंगेकरांचा सरकारला सवाल

आमदार संभाजी पाटील-निलंगेकर म्हणाले, की हे सरकार निष्क्रिय आहे. प्रशासकीय अधिकारी-पोलीस यांना कुठलेच अधिकार नाहीत, म्हणूनच पालघर, नांदेड, लातूर येथे दुर्दैवी घटना घडल्या आहेत. हे असेच चालू राहिले तर राज्यात हाहाकार माजेल. वेळीच आवर घाला मला राजकारण करायचे नाही. मी ठाकरे सरकारला विनंती करत आहे. आम्ही अशा संकट काळात राजकारण करत नाही. पण लोकांवर अन्याय होत असेल तर आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही यावेळी आमदार निलंगेकर यांनी दिला. राज्यात घडत असलेल्या घटनेचा निलंगेकरांनी खरपूस समाचार घेतला.

निलंगा दुहेरी खून प्रकरणात आठ आरोपी अटकेत -

या घटनेतील मृत दोघांवर बोळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी या घटनेतील आठ आरोपींना अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.