ETV Bharat / state

पदवीधर रणधुमाळी : लातुरात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद

मंगळवारी (दि. 12 नोव्हेंबर) सकाळी जिल्ह्यातील 88 केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत होते.

मतदान केंद्र
मतदान केंद्र
author img

By

Published : Dec 1, 2020, 5:25 PM IST

लातूर - औरंगाबाद विभागातील पदवीधर निवडणुकीत नशीब आजमवण्यासाठी अनेक उमेदवार रिंगणात होते. पदविधारांचे प्रश्न, आश्वासने घेऊन उमेदवार मतदारांसमोर जात होते. पण मतदार नेमके कुणाला पसंती देणार पाहावे लागणार आहे. लातूर जिल्ह्यातील 88 केंद्रावर ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या 41 हजार 190 इतकी आहे.

बोलताना अपक्ष उमेदवार

'हा' मुद्दा प्रचारात

लातूर हे शैक्षणिकदृष्ट्या महत्वाचे शहर आहे. त्याअनुषंगाने प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी येथील जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळत विविध आश्वासने दिली आहेत. यावेळी 70-30 कोटा पद्धत रद्दचा मुद्दा प्रचारादरम्यान गाजला. यामुळे लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे विद्यमान आमदार सांगत होते. तर 12 वर्षात एक प्रश्न सत्ताधाऱ्यांनी मार्गी न लावल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

कोरोनाच्या अनुषंगाने विशेष खबरदारी

मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. पण, सकाळच्या सत्रात मतदारांची तुरळक हजेरी केंद्रावर असल्याचे पाहवयास मिळाली. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. प्रत्येक मतदार केंद्राचे लाईव्ह वेबकास्टिंग केले जात आहे. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जात येत नाही तर ठिकठिकाणी मतदान कसे करायचे याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेच्या पूर्वसंध्येला केंद्राच्या ठिकाणी सॅनिटईझेशन करण्यात आले होते. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदाराला आपला हक्क बजावता येणार आहे.

उमेदवार, लोकप्रतिनिधी यांनी बजावला हक्क

मतदारांनी प्रत्यक्ष मतदानाला अत्यल्प प्रतिसाद दिला असला तरी सकाळी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार, अपक्ष उमेदवार रामराजे आत्राम यांनी आपला हक्क बजावला.

हेही वाचा - महाविकास आघाडीत सर्व अलबेल; तिन्ही पक्षांचे नेते प्रचाराच्या रिंगणात - सतीश चव्हाण

हेही वाचा - 'मी पुन्हा येईन', असे वाक्य विचार करून वापरावी लागणार; जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.