ETV Bharat / state

केंद्र सरकारकडून शिवसेनेला सावत्र भावासारखी वागणूक - राज्यमंत्री अब्दुल सत्तार

राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर मंत्र्यांचे पाहणी दौरे सुरू झाले आहेत. यामध्ये विरोधी पक्ष नेत्यांकडूनही पाहणी दौरे करून शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. मात्र, सरकारच्या तिजोरीत सध्या खडखडाट असल्याने राज्याने केंद्राकडून आर्थिक मदतीची अपेक्षा केली आहे. तरीही केंद्र सरकारकडून सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी केला.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार
राज्यमंत्री अब्दुल सत्तार
author img

By

Published : Oct 21, 2020, 1:32 PM IST

लातूर - गेली तीस वर्षे ज्या भाजपाला राज्यात शिवसेनेने मदत केली, त्याचा विसर त्यांना पडला आहे. राज्यात भाजपाला नवसंजीवनी देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. मात्र, आता केंद्र सरकारकडून सावत्र भावासारखी वागणूक दिली जात आहे. हे सर्व जनतेच्या लक्षात येत असल्याची टीका राज्य महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. तसेच वेळप्रसंगी कर्ज काढून हे सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. त्याअनुषंगाने लवकरच कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यात अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसान पाहिणीचे दौरे सत्ताधारी आणि विरोधकांकडून केले जात आहेत. परंतु, यामध्ये राज्य सरकार मदत करणार की केंद्राचे सहकार्य राहणार यावरून राजकारण तापू लागले आहे. राज्यसरकारलाही कर्ज काढून मदत करणे सहज शक्य आहे. पण त्यासाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती नसल्याने केंद्राकडे बोट दाखवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र, राज्यात महाविकासआघाडी सरकारची सत्ता स्थापन झाल्याने केंद्राकडून सावत्र पणासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप सत्तार यांनी केला. शेतकऱ्यांच्या कैवारी कोण हे जनतेला माहीत असून खरच केंद्र सरकार मदतीच्या भूमिकेत असेल तर विरोधी पक्षनेते यांनी दिल्लीत जाऊन बसावे, असे आव्हान मंत्री सत्तार यांनी यावेळी केले.

महाविकास आघाडी सरकारची मदतीची भूमिका आहे म्हणूनच मुख्यमंत्री बांधावर जाऊन पीक पाहणी करीत आहेत. त्यामुळे आता कर्ज काढून का होईना पण शेतकऱ्यांना हे महाविकास आघाडीचे सरकार वाऱ्यावर सोडणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी औसा तालुक्यातील लामजना, किल्लारी, लिंबोळी या शिवरतीलनुकसान झालेल्या पीक पाहणीस सुरुवात केली आहे.

राज्याचे उर्वरित पॅकेज द्या, महाराष्ट्र सरकार कमी पडणार नाही-

केंद्राकडे 26 हजार कोटींचे पॅकेज शिल्लक आहे. ही रक्कम आडवून राज्याची कोंडी केली जात आहे. हे पॅकेज दिल्यास राज्यसरकार कुठेही कमी पडणार नाही. मदतीची जबाबदारी राज्याची राहील, पण रक्कम अडवून केवळ सरकारची नाही जनतेची फसवणूक केंद्र सरकार करीत आहे. विरोधी पक्षनेते यांनी हीच तळमळ केंद्रपुढे मांडली तर रक्कम मिळण्यास मदत होईल, असा टोलाही अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.