ETV Bharat / state

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा नको; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची कुलगुरूंना सूचना

author img

By

Published : Jul 23, 2020, 7:02 PM IST

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, सद्य परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा न घेता अनुकूल वातावरण झाल्यानंतरच परीक्षा घेण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसकर यांना केल्या आहेत.

corona in latur
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा नको; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची कुलगुरूंना सूचना

लातूर - वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, सद्य परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा न घेता अनुकूल वातावरण झाल्यानंतरच परीक्षा घेण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसकर यांना केल्या आहेत.

कोरोनामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. मात्र, प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षीचा अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी होत आहे. नॉन सर्टीफाईन परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या,अशी मागणीही करण्यात आली. तसेच यामध्ये अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इंटरर्नशिप संदर्भातील विषय अंतर्भूत होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच परीक्षांबाबत केंद्रीय मंडळाला कळवण्यात येणार असल्याचे मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सध्या कॅम्पसमध्येच आहेत. या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा 15 सप्टेंबर रोजी असल्याने ठरलेल्या वेळेतच होणार आहे. मात्र, कोरोनामुळे काही अडचण निर्माण झाल्यास त्या वेळी उद्भवणाऱ्या परस्थितीवरून निर्णय घेण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी कुलगुरूंना दिल्या आहेत.

त्यामुळे आता वैद्यकीय शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा केव्हा होणार याकडे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.