लातूर - जिल्ह्यात रात्रीच्या जेवणासाठी बिर्याणी न बनवल्याच्या कारणावरून मद्यधुंद अवस्थेत एका व्यक्तीने पत्नीवर चाकूने वार करून जखमी केल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. नांदेड रोड परिसरातील कुष्टडम येथे ३१ ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी विक्रम विनायक देडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी ही माहिती दिली.
३१ ऑगस्टच्या रात्री आरोपी मद्यधुंद अवस्थेत घरी आला. त्याने पत्नीला मारहाण सुरू केली. रात्रीच्या जेवणासाठी बिर्याणी बनवत नाही म्हणून पत्नीशी वाद घातला. यावेळी कुटुंबातील इतर सदस्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पत्नीला मारहाण केली. नंतर त्याने चाकू घेतला आणि तिच्यावर वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडितेला उपचारासाठी तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिका-याने सांगितले. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.