ETV Bharat / state

लातुरात कोरोनाची धास्ती अन पावसामुळे महानुभाव पंथीयांची तारांबळ

आरोग्य मंत्री टोपे यांनी साधकांना फोनवरून संपर्क करून त्यांच्याशी संवाध साधला आहे. सध्या प्रवास करणे धोकादायक आहे. त्यामुळे, तुम्ही आहे त्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळत रहा. सर्वकाही सोयी-सुविधा पुरवल्या जातील, असे मंत्री टोपे यांनी साधकांना सांगितले आहे. मात्र, स्थानिक प्रशासन या साधकांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे, साधकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

1340 sadhak at nilanga
साधक
author img

By

Published : Apr 14, 2020, 2:57 PM IST

लातूर- लॉकडाऊनमुळे गेल्या महिन्याभरापासून पुणे जिल्ह्यातील जाधववाडी नारायणगाव येथील १३४० तपस्वी साधक-साध्वी हे निलंगा येथे अडकून पडले आहेत. त्यांच्या राहण्याची सोय येथील राठोडा शिवारात करण्यात आली होती. मात्र, साधक ज्या तंबूत रहात होते तो पावसाने उध्वस्त झाल्याने सर्व साधक गावातील शाळेत आणि मंदिरात वास्तव्यास आहेत. मात्र, अपुरी जागा आणि आवश्यक सोयीसुविधांच्या आभावामुळे त्यांना त्रास होत आहे. मंत्री राजेश टोपे यांनी साधक-साध्वींना सोयी पुरवण्याचे आश्वासन दिले आहे.

माहिती देताना साधक

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज निलंगा येथे अडकून पडलेल्या साधक-साध्वींशी फोनवरून संवाद साधला असून त्यांना आहे त्याच ठिकाणी राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्या ठिकाणी सर्व सोयही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले आहे. चार्तुमास महिण्यातील कार्यक्रमासाठी निलंगा तालुक्यातील राठोडा येथे १३४० साधक आले होते. परंतु, संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू महामारीमुळे देशात संचारबंदी लागू झाली. त्यात निलंगा तालुक्यात आलेले ५२० पुरुष साधक आणि ८५० साध्वी हे राठोडा गावात अडकले आहेत. मात्र, सोमवारी सांयकाळी ७ च्या सुमारास गावात अचानक वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. यात साधक-साध्वींना राहण्यासाठी उभा केलेला मोठा मंडप वाऱ्याने उडून गेला.

या घटनेनंतर राठोडा गावातील नागरिकांनी साधक-साध्वींची राहण्याची व्यवस्था गावातील मंदिरात केली. मात्र, हे नागरिक १९ फेब्रुवारीपासून राठोडा गावात अडकलेले आहेत. आता या नागरिकांना आपल्याला पुणे जिल्ह्यातील जाधववाडी या मूळ अश्रमात पाठवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. तसे निवेदन साधक-साध्वींनी जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांना दिले होते. मात्र, अद्याप त्यावर पालकमंत्र्यांनी आणि राज्य शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही. योग्य व्यवस्थेविना या साधक-साध्वींचे हाल होत आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके यांनी सकाळच्या सुमारास गावात जाऊन अडकलेल्या नागरिकांच्या आरोग्याची चौकशी केली आहे. याप्रकरणी लवकरच निर्णय घेऊ, असे अश्वासन सोळुंके यांनी दिले आहे. त्याचबरोबर, आरोग्य मंत्र्यांनीही साधकांना फोनवरून संपर्क करून त्यांच्याशी संवाध साधला आहे. मात्र, स्थानिक प्रशासन या साधकांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे, साधकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा- दुष्काळात तेरावा.. महानुभावांसाठी उभारलेले तंबू पावसाने उद्धवस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.