लातूर : लातूरमध्ये तालुक्यातील चिंचोली बल्लाळनाथ शिवारात लातूरातील एका प्रेमी युगुलाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मागील काही दिवसांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. त्या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी लातूर शहरातील एमआयडीसी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्या फिर्यादीवरुन पोलिसांनी दोघांची शोधाशोध केली. याप्रकरणी शुक्रवारी (दि.17 फेब्रू,2023) मुलीचा तर शनिवारी (दि18 फेब्रू) तरुणाचा मृतदेह विहीरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. यासंदर्भात गातेगाव पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विहिरीत उडी घेऊन आत्महत्या : आत्महत्या केले दोघेही एकमेकांच्या शेजारी राहत होते. लातूर शहरातील बार्शी रोडवरील वसवाडी परिसरात राहणाऱ्या विजय वसंत आदमाने ( वय 21, रा.आवसगाव ता.केज, जि. बीड, ह.मु.वसवाडी, लातूर ). दि.15 फेब्रुवारी रोजी हे दोघेही अचानक गायब झाले. त्यानंतर तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहरातील एमआयडीसी पोलिसांत कलम 363 अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान शुक्रवारी (दि.17 ) चिंचोली बल्लाळनाथ येथील शिवारातील एका विहिरीत मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. यावेळी विहिरीच्या शेजारी एका विजयची चप्पल असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विजय आदमाने याचाही मृतदेह याच विहिरीत असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. गातेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घारगे यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहीम राबवून शनिवारी ( दि.18 फेब्रू ) सकाळी विजय आदमाने याचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर चिंचोली बल्लाळनाथ शिवारात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आकस्मात मृत्यूची नोंद : मृतदेहांची ओळख पटताच शवविच्छेदन करुन मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मृत विजय मुलीच्या नातेवाईकांनी याप्रकरणी बोलण्यास नकार दिला असून यासंदर्भात गातेगाव पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत मुलगी-विजय या प्रेमीयुगलाने 14 फेब्रूवारीला 'व्हॅलेनटाईन डे' साजरा केला. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 फेब्रूवारीला चिंचोलीच्या शिवारात, दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आत्माराम जाधव यांच्या शेतातील विहीरीत उडी मारुन दोघांनी आत्महत्या केली. त्यांच्यासाठी हा 'व्हॅलेनटाईन डे' शेवटचाच ठरला आहे. एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे मृत विजय आणि त्याच्या प्रेयसीने स्वत:च्या आयुष्याचा असा दुर्दैवी अंत केला आहे.
हेही वाचा : Thane News: नाल्यात आढळून आलेल्या 'टायगर'ला इटलीतील दाम्पत्याने घेतले दत्तक