लातूर - लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात लोकांनी सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे मतं पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - मतदानाच्या दिवशी चंद्रकांत पाटलांची विरोधी उमेदवाराला 'ऑफर'
निलंगा शहरातील जि.प. शाळेच्या मतदान केंद्रावर पालकमंत्र्यांनी आपल्या कुटुंबीयासोबत मतदानाचा हक्क बजावला. तसेच लोकशाहीच्या उत्सवात लोकांनी सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन केले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांची पत्नी प्रेरणाताई निलंगेकर मुलगी व मुलगा रणवीर हेही होते.
हेही वाचा - राज्यात हवा बदलली आहे ..असं फक्त पवारानांच वाटते, चंद्रकांत पाटलांचा टोला