लाईव्ह अपडेट -
- 13 वी फेरी - भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर 21201 मतांनी आघाडीवर
- लातूर ग्रामीण - काँग्रेसचे धीरज देशमुख आघाडी 68641
- अहमदपूर 14 वी फेरी - राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील 16622 मतांनी आघाडीवर
- लातूर शहर - अमित देशमुख काँग्रेस आघाडी 21589
- लातूर ग्रामीण - धीरज देशमुख आघाडी 43262
- अहमदपूर १२ वी फेरी - राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील 15297 मतांनी आघाडीवर
- निलंगा- अकराव्या फेरीत भाजपच्या संभाजी पाटील-निलंगेकरांना १७३२५ मतांची आघाडी, सातव्या फेरीअखेर काँग्रेस दुसऱ्यास्थानी, वंचित तिसऱ्या स्थानी
- लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे धीरज देशमुख 30 हजार मतांनी आघाडीवर
- औसा - भाजपचे अभिमन्यू पवार हे सातव्या फेरीअखेर ८४५१ मतांनी आघाडीवर
- लातूर शहर - काँग्रेसचे अमित देशमुख 10521 मतांनी आघाडीवर
- उदगीर - संजय बनसोडे आघाडीवर 8272
- अहमदपूर नववी फेरी - राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील ८५२४ मतांनी आघाडीवर
- उदगीर विधासभा - राष्ट्रवादीचे संजय बनसोडे 6559 मतांनी आघाडीवर
- निलंगा - सातवी फेरी.... संभाजीराव पाटील-निलंगेकर भाजपचे 14080 आघाडी
- पाचवी फेरी - लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे धीरज देशमुख 23,402 मतांनी आघाडीवर
- लातूर शहर - काँग्रेसचे अमित देशमुख 9684 मतांनी आघाडीवर
- सातव्या फेरी अखेर भाजपचे संभाजी पाटील-निलंगेकर 12,300 मतांनी आघाडीवर
- लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे धीरज देशमुख 18000 मतांनी आघाडी
- लातूर शहर - काँग्रेसच्या अमित देशमुखांची आघाडी कायम
- लातूर ग्रामीण- धीरज देशमुखही आघाडीवर
- औसा - भाजपचे अभिमन्यू पवार आघाडीवर
- उदगीर - राष्ट्रवादीचे संजय बनसोडे आघाडीवर
- अहमदपूर - राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील आघाडीवर
- निलंगा - भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर 10 हजार 100 मतांनी आघाडी
- लातूर शहर पहिली फेरी - काँग्रेसचे अमित देशमुख 5911, शैलेश लाहोटी 2687
- संभाजी पाटील-निलंगेकर तिसऱ्या फेरीअखेर ७५०० मतांनी आघाडीवर
- भाजपचे संभाजी पाटील-निलंगेकर दुसऱ्या फेरी अखेर ४५०० मतांनी आघाडीवर...
- लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख 5500 मतांनी आघाडीवर तर शिवसेनेचे उमेदवाराला 383 मते तर नोटाला 1481 मते पडली आहेत...म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराला नोटांपेक्षा 1100 मते कमी आहेत,
- अहमदपूर - राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील 897 मतांनी आघाडीवर
- उदगीर - पहिल्या फेरीत राष्ट्रवादीच्या संजय बनसोडे यांना 1700 मतांची आघाडी
- लातूर शहर - काँग्रेसचे अमित देशमुख आघाडीवर
- लातूर ग्रामीण - काँग्रेसचे धीरज देशमुख आघाडीवर
- निलंगा - भाजपचे संभाजी पाटील- निलंगेकर आघाडीवर
- उदगीर - राष्ट्रवादीचे संजय बनसोडे आघाडीवर
लातूर - जिल्ह्यात 6 पैकी 4 मतदारसंघात काटे की टक्कर होत आहे. यामध्ये लातूर शहर, औसा, उदगीर आणि अहमदपूर मतदारसंघाचा समावेश आहे. लातूर शहरात आ. अमित देशमुख तर औसा येथे बसवराज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अगदी काही वेळातच या मतदारसंघाचे निकाल हाती येण्यास सुरुवात होईल. पण उमेदवरांबरोबर कार्यकर्त्यांचीही धाकधूक वाढली असून संबंध राज्याचे लक्ष लातूर शहर मतदारसंघाकडे लागले आहे आहे.
जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा आजचा निकाल राहणार आहे. यामध्ये लातूर ग्रामीण आणि निलंगा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट असून लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख तर निलंग्यात संभाजी पाटील-निलंगेकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. लातूर शहरात मात्र, कमालीची कमालीची उत्सुकता पाहवयास मिळत आहे. भाजपा, वंचित आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या उमेदवारांमध्ये खरी लढत असून वंचितच्या मतांचा परिणाम अमित देशमुख यांच्यावरती होणार की, भाजपचे शैलेश लाहोटी यांच्यावरती यावरच येथील गणिते अवलंबून राहणार आहेत. तर दुसरीकडे औसा मतदारसंघात काँग्रेसच्या बसवराज पाटील यांना भाजपाचे उमेदवार अभिमन्यू पवार यांचे आव्हान आहे. मात्र, भजपातून बंडखोरी करून उभा टाकलेले बजरंग जाधव यांचा अभिमन्यू पवार यांना किती फटका बसतो यावर येथील आमदार ठरणार आहे.
अहमदपूर मतदारसंघात भाजपात वाढलेली बंडखोरीमुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला किती फायदा होतो हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. उदगीर मतदारसंघातही भाजपातील अंतर्गत मतभेद ऐनवेळी चव्हाट्यावर आले होते. शिवाय नवख्या डॉ. अनिल कांबळे यांना संधी दिल्याने याठिकाणीही राष्ट्रवादी उमेदवार संजय बनसोडे यांनाच फायदा होणार आहे.
अगदी काही वेळात जिल्ह्यातील निकाल हाती येण्यास प्रारंभ होणार असून चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, औसा, लातूर, उदगीर, अहमदपूर येथील निकाल हे लक्षवेधी ठरणार आहेत.