लातूर - प्रचाराची सांगता होताच आज सायंकाळी ६ च्या दरम्यान शिवाजी नगर ठाणे हद्दीत आणि आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत देशी आणि विदेशी दारू पकडण्यात आली आहे. चार ठिकाणी हि कारवाई करण्यात आली असून रात्र वैऱ्याची असल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.
प्रचाराच्या तोफा थंड होताच वेगळ्या पद्धतीने प्रचाराला सुरवात झाली आहे. त्याचा प्रत्यय लातुरात येत असून काही वेळच्या अंतराने चार ठिकाणी वाहनांवर कारवाई करून अवैधरित्या पाहचविली जाणारी दारू पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. गेल्या पंधरा दिवसांचा प्रचार आणि आता दोन दिवसात होणारा प्रचार लक्षात घेता जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिस्थितीत प्रत्येक गावात आणि वेगवेगळ्या भागात दारू पोहचविण्यासाठी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. यातून लातूर शहरातून वेगवेगळ्या भागात जाणाऱ्या देशी आणि विदेशी दारू घेऊन जाताना पोलिसांनी कारवाई केली आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी तीन वाहनावर कारवाई केली आहे. यात एक ऑटोरिक्षा ,एक कार ,एक इन्होवा गाडीतून २४ बॉक्स देशीदारू .. पाच बॉक्स विदेशी दारू याची वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी तीन लोकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये क्रुझरमधून १० विदेश दारूचे बॉक्स, ऑटोमधून विदेशी दारू बॉक्स तर मोटरसायकल व मोपेड मधून दारुचा १ विदेशी बॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. शिवाय १० जणांना ताब्यात घेतले आहे.