लातूर - लातूर लोकसभेची निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची तर भाजपासाठी प्रतिष्ठेची होत आहे. मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ नावालाच आहेत. त्यामुळे या दोन्ही मित्र पक्ष फारसा परिणाम पाडतील असे वाटत नाही. मात्र, यंदा नव्याने लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीमुळे मताच्या गोळाबेरजेवर परिणाम होणार हे नक्की. त्यामुळेच निकाल लागल्यानंतर क्रमांक एकचा उमेदवार आणि क्रमांक दोनच्या उमेदवारामध्ये अधिक मताचा फरक राहणार नाही, असे बोलले जात आहे.
सध्या निवडणुकांचे वारे जोमात वाहत असून काँग्रेसकडून मच्छिंद्र कामत, भाजपकडून सुधाकर श्रृंगारे तर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राम गारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 'दोघात तिसरा' या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे यंदाची निवडणुक चुरशीची होणार यामध्ये शंका नाही. २०१४च्या निवडणूकीत भाजपने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. त्यानंतर जिल्ह्यातल्या विधानसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थापर्यंत भाजपने स्वतःचे वर्चस्व निर्माण केले. हा करिष्मा भाजपला विलासराव देशमुख यांचे २०१२ला झालेले निधन आणि २०१४च्या निवडणूकांमधील मोदींची लाटेच्या जोरावर करता आला.
यावेळची परिस्थिती वेगळी आहे. शृंगारे हे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या गोटातले आहेत. त्यामुळे ते उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासूनच प्रचाराच्या कामाला लागले आहे. निलंगेकर दररोज आढावा घेत आहेत. कोणी नाराज असेल तर त्यांची नाराजीही दूर करण्याचा प्रयत्नही त्यांनी सुरु केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात मात्र अजुनही मरगळ असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा मतदार संघा निहाय राजकीय पक्षांचे वर्चस्व -
जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदार संघाचा समावेश लोकसभा मतदार संघात आहे. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदार संघावर आजही देशमुखांची मजबूत पकड आहे. ग्रामीण भागात साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे संघटन तर शहरात दिवंगत विलासराव देशमुख यांचे वलय आजही कायम आहे. मात्र, इतर तीन मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचा उमेदवार विक्रमी मतांनी लोकसभेत दाखल झाला होता. त्यानंतर भाजपने महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीत वर्चस्व प्रस्थापित केले. असे असले तरीही ही निवडणूक भाजपसाठी सोपी नाही, कारण अंतर्गत गटबाजीमुळे उदगीर मतदार संघाचे आमदार सुधाकर भालेराव हे पालकमंत्र्यांच्या नेतृत्वावर नाराज आहेत. तर विद्यमान खासदारांना तिकीट डावल्याने ते ही या निवडणुकीपासून दूर आहेत. भाजपमध्ये तीन गट तयार झाले असून त्यांची मोट आवाळण्याचे आव्हान पक्षासमोर आहे.
सद्याची राजकीय परिस्थिती -
लातूर लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने जातीय समिकरणे महत्वपूर्ण ठरत आहेत. यातच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकाच समाजातील उमेदवराला तिकीट दिल्याने मत विभाजनाचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होणार असल्याचे बोलले जात आहे.
सध्या निवडणुकांचे वारे जोमात वाहत असून काँग्रेसकडून मच्छिंद्र कामत, भाजपकडून सुधाकर श्रृंगारे तर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राम गारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, या निवडणुकीच्या माध्यमातून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. तर काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या अपेक्षा अमित देशमुख यांच्याकडून वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकांच्या निकालावर या दोघांचेही भवितव्य अवलंबून असणार आहे.
मतदारांचे प्रश्न कायम -
गतवेळची निवडणूक ही पाणी प्रश्नावर गाजली होती. या प्रश्नाच्या अजेंड्यावर सत्तापरिवर्तन झाले असतानाही गेल्या पाच वर्षात उजनीचे पाणी लातूरकरांना मिळणार हे भाजपचे आश्वासन हवेतच विरले आहे. पाण्याबरोबरच बेरोजगारी, शेती, सिंचनाशी निगडीत प्रश्न सोबतच रखडलेले रेल्वे बोगीचे काम या प्रश्नांभोवती ही निवडणूक फिरणार आहे. त्यामुळे दिलेल्या आश्वासनांचे काय झाले हा भाजपसमोर मोठा प्रश्न आहे. तर काँग्रेस यापैकी कोणता मुद्दा निवडणूकी दरम्यान लावून धरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
लातूर मतदार संघाचा आतापर्यंतचा इतिहास -
लातूर हा स्वतंत्र मतदार संघ होऊन आतापर्यंत १४ निवडणुका पार पडल्या. या सर्व निवडणूकांमध्ये प्रमुख लढत काँग्रेस आणि भाजपमध्येच होती. त्यात तब्बल ११ वेळा काँग्रेसच्या उमेदवारानी बाजी मारली तर केवळ दोनदा भाजपला आणि एकादा शेकापच्या उमेदवार या ठिकाणावरुन निवडून आला. तब्बल ११ वेळा काँग्रेसच्या उमेदवाराचे या मतदार संघावर वर्चस्व राहिले आहे. यात दिवंगत विलासराव देशमुख आणि माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची भूमिका महत्त्वाची राहिली होती. सोबतच आयात केलेल्या उमेदवरांनाही थेट लोकसभेत पाठविण्याचे रेकॉर्डही लातूर मतदार संघातूनच झाले आहे.
२००९ पासून हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला आहे, असे असतानाही काँग्रेसने आयात केलेले उमेदवार जयवंत आवळे यांनाच लातूरकरांनी पसंती दिली. त्यावेळी जयवंत आवळे यांनी भाजपचे स्थानिक उमेदवार विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचा पराभव केला होता. याकरता केवळ मतदारांचा कौलच महत्वाचा नव्हता तर मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले विलासराव देशमुख यांच्या विकास कामांचा परिणाम सबंध जिल्ह्याच्या राजकारणावर होत होता. जातीय समीकरणांचे मेळ घालून विरोधकही कोण असणार हे विलासराव देशमुखच अप्रत्यक्ष ठरवित असत. विकास कामाबरोबर राजकीय समतोल साधून जिल्ह्याची वाटचाल होत असे.
जिल्ह्यात सद्या भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे हे वर्चस्व कायम ठेवण्याच्या दृष्टीने भाजपची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपासून सातत्याने पराभावाचा सामना कराव्या लागणाऱ्या काँग्रेससाठी ही निवडणूक अस्तित्व दाखवून देण्यासाठी महत्वाची ठरणार आहे.
२०१४ चा निवडणूक निकाल -
- डॉ. सुनील गायकवाड (भाजप) : ६,१६, ५०९
- दत्तात्रय बनसोडे (काँग्रेस): ३,६३,११४
समाविष्ट विधानसभा मतदार संघ
- लातूर : अमित देशमुख (काँग्रेस)
- लातूर ग्रामीण : त्र्यंबक भिसे (काँग्रेस)
- निलंगा : संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
- उदगीर : सुधाकर भालेराव (भाजप)
- अहमदपूर : विनायक पाटील (अपक्ष)
- लोहा, कंदर (जि. नांदेड): प्रताप चिखलीकर
मतदारांची एकूण संख्या : २१,३६,५२२
- पुरुष : ११२८९५३
- स्त्री : १००७५६५
- इतर : ०४
मतदार संघातील आतापर्यंतचे खासदार
- टी.डी. कांबळे, काँग्रेस (१९६२-६७, १९६७-७१, १९७१-७७)
- उद्धवराव पाटील, शेकाप (१९७७-८०)
- शिवराज पाटील चाकूरकर, काँग्रेस (१९८० ते २००४)
- रूपाताई निलंगेकर पाटील, भाजप (२००४-२००९)
- जयवंत आवळे, काँग्रेस (२००९-२०१४)
- डॉ. सुनील गायकवाड, भाजप (२०१४-२०१९)

Intro:Body:
लातूर लोकसभा मतदारसंघ: एकेकाळच्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा अबाधित राहणार का?
Latur Lok sabha constituency review
Latur Lok sabha constituency, Latur, Lok sabha, लातूर लोकसभा मतदारसंघ, लातूर, लातूर लोकसभा मतदारसंघ आढावा

डॉ. सुनील गायकवाड (भाजप) : ६,१६, ५०९
दत्तात्रय बनसोडे (काँग्रेस): ३,६३,११४
समाविष्ट विधानसभा मतदार संघ
लातूर : अमित देशमुख (काँग्रेस)
लातूर ग्रामीण : त्र्यंबक भिसे (काँग्रेस)
निलंगा : संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
उदगीर : सुधाकर भालेराव (भाजप)
अहमदपूर : विनायक पाटील (अपक्ष)
लोहा, कंदर (जि. नांदेड): प्रताप चिखलीकर
मतदारांची एकूण संख्या : २१,३६,५२२
पुरुष : ११२८९५३
स्त्री : १००७५६५
इतर : ०४
मतदार संघातील आतापर्यंतचे खासदार
१) टी.डी. कांबळे, काँग्रेस (१९६२-६७, १९६७-७१, १९७१-७७)
२) उद्धवराव पाटील, शेकाप (१९७७-८०)
३) शिवराज पाटील चाकूरकर, काँग्रेस (१९८० ते २००४)
४) रूपाताई निलंगेकर पाटील, भाजप (२००४-२००९)
५) जयवंत आवळे, काँग्रेस (२००९-२०१४)
६) डॉ. सुनील गायकवाड, भाजप (२०१४-२०१९)
Conclusion: