ETV Bharat / state

लातूर लोकसभा : भाजपचे सुधाकर श्रृंगारे यांचा दणदणीत विजय, कार्यकर्त्यांचा जल्लोष

लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे विजयी झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामांत हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते.

सुधाकर श्रृंगारे आणि मच्छिंद्र कामंत
author img

By

Published : May 23, 2019, 6:16 AM IST

Updated : May 23, 2019, 9:43 PM IST

लातूर - मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच लातूर लोकसभा मतदारसंघात आघाडीवर असलेले भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे विजयी झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामांत हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते. भाजपने येथे आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सर्वकष प्रयत्न केले होते. तर गतवैभव मिळवण्यासाठी आमदार अमित देशमुख यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर केंद्रीय मंत्र्यांनीही या मतदारसंघात सभा घेतल्या. तर दुसरीकडे सचिन पायलट वगळता एकाही वरिष्ठ नेत्याने लातूर मतदार संघाकडे लक्ष केंद्रित दिले नाही. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून भाजप उमेदवार श्रृंगारे एकतर्फी आघाडीवर दिसून येत होते. तर दुसऱ्या स्थानासाठी काँग्रेस आणि वंचित आघाडीमध्ये संघर्ष दिसत होता.

वंचित बहुजन आघाडीचा परिणाम येथील लोकसभा निवडणुकांवर होणार असल्याचा अंदाज वर्तीवला जात होता. मात्र, सर्व शंका- कुशंका बाजूला सारत मताधिक्यात भाजप सातत्याने पुढेच जात आहे.

  • महत्वाच्या घडामोडी -
  • 02.25 PM - भाजपचे सुधाकर श्रृंगारे यांना २ लाख ५ हजार १६१ मते मिळाली आहेत. कांग्रेसचे मच्छिंद्र कामांत यांना १ लाख १४ हजार ८४१ मते आणि वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर यांना ४० हजार ७५९मते.
  • 01.45 PM - भाजपचे सुधाकर श्रृंगारे 86 हजार मतांनी आघाडीवर
  • 10.30 am - भाजपचे सुधाकर श्रृंगारे २३ हजार ७१९ मतांनी आघाडीवर. श्रृंगारे यांना आतापर्यंत ४० हजार २१२ मते, कांग्रेसचे मच्छिंद्र कामांत यांना १६ हजार ४९३ मते तर बंचित बहुजन आघाडीचे राम गारकर यांना ५ हजार ५७४ मते मिळाली आहेत.
  • 8.00 am - मतमोदणीला सुरुवात
  • 8.29 am - भाजपने सुधाकर श्रृंगारे आघाडीवर

ही निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची तर भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. येथील मदरासंघातील मतमोजणीला शहरातील बारशी रोडवरील गर्व्हरमेंट रेसिडेंटल विमेन पॉलिटेक्निकल, येथे थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणूक - 2014 मध्ये लातूर मतदार संघात 62.69 टक्के, तर लोकसभा निवडणूक - 2019 मध्ये 62.19 टक्के मतदान झाले.

गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले होते. यावेळी निवडणुकीत भाजपच्या डॉ. सुनील गायकवाड यांनी काँग्रेसच्या दत्तात्रय बनसोडेंचा पराभव केला होता. त्यानंतर जिल्ह्यातल्या विधानसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत भाजपने स्वतःचे वर्चस्व निर्माण केले. हा करिष्मा भाजपला २०१४ च्या निवडणुकांमधील मोदींच्या लाटेच्या जोरावर करता आला होता.

या निवडणुकीच्या माध्यमातून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या अपेक्षा अमित देशमुख यांच्याकडून वाढल्या आहेत. आज येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या निकालावर या दोघांचेही भवितव्य अवलंबून असणार आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 9:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.