ETV Bharat / state

जेव्हा संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार अमित देशमुखांची करतात नक्कल

लातूर शहरासाठी माझ्यासमोर भाजपकडे विरोधकच नसल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले होते. याला संभाजी पाटील यांनी प्रत्युत्तर दिले नाही तर त्यांची नक्कलही करून दाखवली आहे.

interview sambhaji patil nilangekar
author img

By

Published : Sep 28, 2019, 8:57 PM IST

लातूर - विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. लातूर जिल्ह्यातील निवडणूक ही पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिष्ठेची मानली जात आहे. लातूर शहरासाठी माझ्यासमोर भाजपकडे विरोधकच नसल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले होते. याला संभाजी पाटील यांनी प्रत्युत्तर दिले नाही, तर त्यांची नक्कलही करून दाखवली. या दोघांचे मतदारसंघ जरी वेगळे असले तरी ही निवडणूक त्यांच्या भोवतीच रंगणार हे स्पष्ट झाले आहे.

पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर

हेही वाचा - या वयात पवारांना बदनामी सहन करावी लागते, हे पटलं नाही - अजित पवार

उजनीचे पाणी हा या निवडणुकीचा केंद्रबिंदू आहे. आगामी 2 वर्षांत उजनीचे पाणी लातूरकरांना मिळवून नाही दिले, तर आहे त्या राजकीय पदांचा राजीनामा देणार असल्याचे पालकमंत्री संभाजी पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. केवळ मोदी लाटच नव्हे तर 5 वर्षातील विकासकामे हा आमचा अजेंडा राहणार आहे. जलसंधारण, रेल्वे बोगी यासारखी कामे झाल्याने बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. केवळ लातूर शहरच नव्हे तर संबंध जिल्ह्यात विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली असल्याचा दावा त्यांनी केला.

हेही वाचा - 'ईडी' चौकशीचा व भाजपचा काही संबंध नाही - चंद्रकांत पाटील

विधानसभेनंतर काँग्रेसमुक्त लातूर

गेल्या 5 वर्षात येथील स्थानिक स्वराज संस्थांपासून ते जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यावर परिवर्तन झाले आहे. लोकसभेमध्येही मोठा जनाधार मिळाला आहे. आगामी विधानसभेत जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात युतीचाच झेंडा असणार, असा विश्वास संभाजी पाटील यांनी व्यक्त केला.

दोन्ही भैय्यात होऊ शकते लढाई...!

माझ्यासमोर भाजपकडे उमेदवाराच नसल्याचे अमित देशमुख यांनी सांगून नेतृत्वाला आव्हान दिले आहे. यासंबधी सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा कोणीही निवडणूक लढवू शकतो, असे पालकमंत्री यांनी सांगितले. तर पक्षाने आदेश दिले तर लातूर शहरातूनही निवडणूक लढवू शकतो, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - 'कुटुंबात गृहकलह नाही; शरद पवार सांगतील तेच आम्ही सर्व जण ऐकतो'

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे वर्चस्व

2014 पूर्वी लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, गेल्या 5 वर्षात स्थानिक स्वराज संस्था ते महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यावर भाजपने वर्चस्व निर्माण केले आहे. 6 विधानसभा मतदारसंघापैकी 3 जागेवर काँग्रेस तर 3 जागांवर भाजपची सत्ता आहे. या निवडणुकीत आमदार अमित देशमुख यांचे अस्तित्व पणाला लागले आहे, तर संभाजी पाटील यांना वर्चस्व दाखवून द्यायचे आहे.

साठे सरांनी सांगितल्याप्रमाणे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची मुलाखत पाठवीत आहे.

जेव्हा पालकमंत्री संभाजी पाटील आमदार अमित देशमुख यांची नक्कल करतात....
लातूर : विधानसभा निवडणुकांचे रणशिंग सुरू झाले असून लातूर जिल्ह्यातील निवडणूक ही पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आ. अमित देशमुख यांच्या प्रतिष्ठेची मानली जात आहे. लातूर शहरासाठी माझ्यासमोर भाजपाकडे विरोधकच नसल्याचे आ. अमित देशमुख यांनी सांगितले होते. याला संभाजी पाटील यांनी प्रतिउत्तरच दिले नाही तर त्यांची नक्कलही करून दाखवली. या दोघांचे मतदारसंघ जरी वेगळे असले तरी ही निवडणूक यांच्याभवतीच रंगणार हर स्पष्ट झाले आहे.
उजणीचे पाणी हा या निवडणुकीचा केंद्रबिंदू असून आगामी 2 वर्षात उजणीचे पाणी लातूरकरांना मिळवून नाही दिले तर आहे त्या राजकीय पदाचा राजीनामा देणार असल्याचे पालकमंत्री संभाजी पाटील यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. केवळ मोदी लाटच नव्हे तर 5 वर्षातील विकासकामे हा आमचा अजेंडा राहणार आहे. जलसंधारण, रेल्वे बोगी यासारखी कामे झाल्याने बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. केवळ लातूर शहरच नव्हे तर संबंध जिल्ह्यात विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली असल्याचा दावा त्यांनी केला.

विधांसभेनंतर काँग्रेसमुक्त लातूर
गेल्या 5 वर्षात येथील स्थानिक स्वराज संस्थांपासून ते जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यावर परिवर्तन झाले आहे. लोकसभेमध्येही मोठा जनाधार मिळाला असून आगामी विधानसभेत जिल्ह्यातील सहाही मतदार संघात युतीचाच झेंडा असणार असा विश्वास संभाजी पाटील यांनी व्यक्त केला.

दोन्ही भैय्यात होऊ शकते लढाई...!
माझ्यासमोर भाजपाकडे उमेदवाराच नसल्याचे अमित देशमुख यांनी सांगून नेतृत्वाला आव्हान दिले आहे. यासंबधी सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा कोणीही निवडणूक लढवू शकतो असे पालकमंत्री यांनी सांगितले. तर पक्षाने आदेश दिले तर लातूर शहरातूनही लढवू शकतो असे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे वर्चस्व
2014 पूर्वी लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, गेल्या 5 वर्षात स्थानिक स्वराज संस्था ते महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यावर भाजपाने वर्चस्व निर्माण केले आहे. 6 विधानसभा मतदारसंघापैकी 3 जागेवर काँग्रेस तर 3 जागवर भाजपाची सत्ता आहे. या निवडणुकीत आ. अमित देशमुख यांचे अस्तित्व पणाला लागले आहे तर संभाजी पाटील यांना वर्चस्व दाखवून द्यायचे आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.