लातूर - वेळ अमावस्या साजरी करण्यासाठी गावी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 24 डिसें) रोजी घडली. शाम वसंत राजगिरवाड (वय 19 वर्षे, रा. चेरा, ता. जळकोट) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
औरंगाबाद-मुखेड या एसटी बसची व जीपची समोरासमोर धडक झाली होती. यामध्ये 3 जण जागीच ठार झाले होते तर 15 हून अधिक प्रवासी जखमी झाले असून यामध्ये शामच्या आजीचाही समावेश आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामधील चंदन सावरगाव जवळ घडली होती.
हेही वाचा - 'वेळ अमावस्ये'निमित्त लातूकरांमध्ये उत्साह, वनभोजनाचा घेतला आनंद
कर्नाटकच्या सीमावर्ती भागात असलेल्या लातूर जिल्ह्यात वेळ अमावस्येचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तो सण साजरा करण्यासाठी आपल्या गावापासून दूर असलेले गावकरी गावी परतत असतात. बाहेरगावी असलेले आजी-नातूही हा सण साजरा करण्यासाठी आपल्या गावी परतत होते. त्यावेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेने गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - बीड : चंदन सावरगाव जवळ भीषण अपघात; तीन ठार, 15 जखमी