ETV Bharat / state

लातुरात गरजूंना मदत करताना व्हायचे फोटोसेशन; जिल्हाधिकाऱ्यांनी घातली बंदी

गरजूंना मदत करताना सामाजिक संघटना, पक्षाचे पदाधिकारी यांनी फोटोसेशनचा सपाटा कायम ठेवला. त्यामुळे, आता आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिला आहे.

corona latur
मदत करताना नागरिक
author img

By

Published : Apr 13, 2020, 4:38 PM IST

लातूर- गरजूंना केली जात असलेली मदत ही सध्या काळाची गरज आहे. पण, एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला कळू नये असे म्हणतात. मात्र, सध्याचे चित्र वेगळे आहे. मदत करतानाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करून एक प्रकारची जाहिरातबाजी करण्याची क्रेज सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत मदत व दान करताना होणाऱ्या फोटोसेशनला आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मनाई केली आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

काही ठिकाणी दान देताना सोशल डिस्टंन्सिगचे भान ठेवले जात नाही. अन्नधान्य तसेच अन्नपाकिटांचे वाटप करताना गर्दी होऊ लागली. यातून टाळेबंदीचा फज्जा उडू लागला. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी गरजू व्यक्तींना अन्नधान्य, जेवण व अन्य वस्तू दान करतानाचे फोटो घेऊ नयेत किंवा त्याचे छायाचित्रीकरण करू नये, असे आदेश दिले आहेत. शिवाय ज्यांना मदत करायची आहे त्यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र, सामाजिक संघटना, पक्षाचे पदाधिकारी यांनी मदतीचा आणि फोटोसेशनचा सपाटा कायम ठेवला. त्यामुळे, आता आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना दिला आहे.

हेही वाचा- शरीराने लातुरात मनाने कुटुंबियांसोबत; लॉकडाऊनमुळे शहरात अडकलेल्या कामगारांची व्यथा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.