ETV Bharat / state

महाजनादेश यात्रा म्हणजे सर्वसामान्यांची मुस्कटदाबी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप

शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने 26 ऑगस्ट रोजी ही यात्रा औरंगाबाद येथे जात असताना यात्रा अडविण्याचा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी केला होता. तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती. शुक्रवारी उस्मानाबाद दौऱ्यावर असतानाही त्यांची पोलिसांनी अडवणूक केली होती. त्यामुळे राज्य सरकार हे शेतकऱ्यांची आणि त्यांचे प्रश्न मंडणाऱ्यांची गळचेपी करीत असल्याचा आरोप पूजा यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

author img

By

Published : Sep 8, 2019, 9:01 PM IST

पत्रकार परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे आणि आदी.

लातूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवरून स्वाभिमानी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी निशाणा साधला आहे. ५ वर्षात केलेली कामे आणि जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी सरकारने काढलेली महाजनादेश यात्रा ही समस्या जाणून घेण्यासाठी नाही तर सर्वसामान्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. यात्रेदरम्यान शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली असता, सरकारने अटकसत्र सुरू केले असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्या शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

महाजनादेश यात्रा म्हणजे सर्वसामान्यांची मुस्कटदाबी; स्वाभिमानी शेतकरी संघटनचा आरोप

हेही वाचा - राम जेठमलानी यांच्या जाण्याने निष्णात कायदेपंडित गमावला - पंतप्रधान मोदी

मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत आहे. पावसाने पाठ फिरवल्याने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी या यात्रेदरम्यान आम्ही केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केलेल्या विकासकामांची गाथा गात होते. प्रत्यक्षात शेतकरी नापिकी, कर्ज याला कंटाळून आत्महत्या करीत आहे, असे मोरे यांनी सांगितले.

हेही वाचा - असे वकील ज्यांनी इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांची केली वकिली; जेठमलानींनी लढलेले वादग्रस्त खटले

शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने 26 ऑगस्ट रोजी ही यात्रा औरंगाबाद येथे जात असताना ही यात्रा अडविण्याचा प्रयत्न पूजा यांनी केला होता. तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती. शुक्रवारी उस्मानाबाद दौऱ्यावर असतानाही त्यांची पोलिसांनी अडवणूक केली होती. त्यामुळे राज्य सरकार हे शेतकऱ्यांची आणि त्यांचे प्रश्न मंडणाऱ्यांची गळचेपी करीत असल्याचा आरोप त्यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

हेही वाचा - बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना खूशखबर ; सणाच्या मुहुर्तावर कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ

दरम्यान, शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या घेऊन 16 सप्टेंबर रोजी कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती न घेता आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Intro:बाईट : पूजा मोरे (युवती प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

महाजनादेश यात्रा म्हणजे सर्वसामान्यांची मुस्कटदाबी : पूजा मोरे
लातूर : पाच वर्षात केलेली कामे आणि जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी सरकारने काढलेली महाजनादेश यात्रा ही समस्या जाणून घेण्यासाठी नाही तर सर्वसामान्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी असल्याचा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी केला आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी या यात्रेदरम्यान केली असता सरकारने अटकसत्र सुरू केले आहे. 12 दिवसानंतर पोलीस मागावर असल्याचा आरोप पूजा मोरे यांनी केला आहे.
Body:मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत आहे. पावसाने पाठ फिरवल्याने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची या यात्रेदरम्यान केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केलेल्या विकासकामांची गाथा गात होते. प्रत्यक्षात शेतकरी नापिकी, कर्ज याला कंटाळून आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने 26 ऑगस्ट रोजी ही यात्रा औरंगाबाद येथे जात असताना यात्रा अडविण्याचा प्रयत्न पूजा मोरे यांनी केला होता. तेव्हाही त्यांना अटक करण्यात आली होती. शुक्रवारी उस्मानाबाद दौऱ्यावर असतानाही त्यांची पोलिसांनी अडवणूक केली होती. त्यामुळे राज्य सरकार हे शेतकऱ्यांची आणि त्यांचे प्रश्न मंडणाऱ्यांची गळचेपी करीत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. Conclusion:शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या घेऊन 16 सप्टेंबर रोजी आयुक्त कार्यालयावर शेतकऱ्यांना घेऊन मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.