ETV Bharat / state

लातूरच्या ५४१ गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा ; ३३ गावांची टँकरवर मदार

सर्वाधिक टँकर लातूर तालुक्यातील १४ गावांमध्ये सुरू असून प्रस्ताव दाखल होताच पाहणी करून उपाययोजना केली जाणार असल्याचे जिल्हाअधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे.

३३ गावांची टँकरवर मदार
author img

By

Published : Apr 23, 2019, 9:57 PM IST

लातूर - वाढत्या उन्हाबरोबर जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळाही तीव्र जाणवू लागल्या आहेत. गेल्या महिन्याभरात टँकरची संख्या ३ वरून थेट ३३ वर गेली असून ५४१ गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणूव लागली आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या उद्देशाने ४५५ अधिग्रहणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. शहरात मात्र १० दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.

गतवर्षी सरासरीपेक्षा ६० टक्के एवढाच पाऊस झाल्याने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या टप्प्यातच पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. गावस्तरावरील प्रकल्पांनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांचीही दाहीदिशा भटकंती होत आहे. जिल्ह्यात ४२९ गावे आणि ११२ वाड्यांवर पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर ५४१ गावातून तब्बल ८०० अधिग्रहाणाच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे.

३३ गावांची टँकरवर मदार

सर्वप्रथम लातूर तालुक्यातील चिंचोली बल्लाळा या गावात टँकरचा श्रीगणेशा झाला होता. पहिल्या टप्प्यात ३ गावांमध्ये ३ टँकर सुरू झाले होते. मात्र, महिन्याभरात टँकरची संख्या वाढली असून ३३ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत असून मागणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरणही मृतसाठ्यात असून १ महिन्यापासून शहराला १० दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. हेच नियोजन अंतिम टप्प्यापर्यंत ठेवण्याचा मानस आयुक्त एम.डी. सिंह यांनी व्यक्त केला आहे.

Intro:५४१ गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा ; ३३ गावांची टँकरवर मदार
लातूर - वाढत्या उन्हाबरोबर जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळाही तीव्र जाणवू लागल्या आहेत. गेल्या महिन्याभरात टँकरची संख्या ३ वरून थेट ३३ वर गेली असून ५४१ गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणूव लागली आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या उद्देशाने ४५५ अधिग्रहणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. शहरात मात्र १० दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.
Body:गतवर्षी सरासरीपेक्षा ६० टक्के एवढाच पाऊस झाल्याने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या टप्प्यातच पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. गावस्तरावरील प्रकल्पांनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांचीही दाहीदिशा भटकंती होत आहे. जिल्ह्यात ४२९ गावे आणि ११२ वाड्यांवर पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर ५४१ गावातून तब्बल ८०० अधिग्रहाणाच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. सर्वप्रथम लातूर तालुक्यातील चिंचोली बल्लाळा या गावात टँकरचा श्रीगणेशा झाला होता. पहिल्या टप्प्यात ३ गावांमध्ये ३ टँकर सुरू झाले होते. मात्र, महिन्याभरात टँकरची संख्या वाढली असून ३३ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत असून मागणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरणही मृतसाठ्यात असून १ महिन्यापासून शहराला १० दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. हेच नियोजन अंतिम टप्प्यापर्यंत ठेवण्याचा मानस आयुक्त एम.डी. सिंह यांनी व्यक्त केला आहे. Conclusion:सर्वाधिक टँकर लातूर तालुक्यातील १४ गावांमध्ये सुरू असून प्रस्ताव दाखल होताच पाहणी करून उपाययोजना केली जाणार असल्याचे जिल्हाअधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.