लातूर - लोकसंख्येच्या प्रमाणानुसार मातंग समाजाला अनुसूचित जमातीमध्ये अ.ब.क ड नुसार स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन काण्यात आले. लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राज्यभर हे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - लातूर : चाकुरात शटर उचकटून चोरट्यांनी सराफ दुनाकातील साडेतीन किलो चांदी केली लंपास
हिवाळी अधिवेशनात स्वतंत्र आरक्षणाचा मुद्दा समोर आणण्यासाठी राज्यात सर्वत्र आंदोलन केले जात आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीमध्ये या समाजाचा वर्गवारीनुसार स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली. यापूर्वीही मातंग समाजाच्या वतीने आंदोलन, उपोषण करण्यात आले होते. मात्र, याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे.
हेही वाचा - CAA protest: उदगीरमध्ये आक्रोश मोर्चा; मोदी, शाह विरोधात घोषणाबाजी
वर्गवारीनुसार आरक्षण न मिळाल्याने समाजाचा विकास खुंटला आहे. यापूर्वी युती सरकारनेही याकडे दुर्लक्ष केले होते, आता महाविकास आघाडीच्या काळात तरी न्याय मिळावा, म्हणून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माया लोंढे, सचिव मनीषा पुंड, रेश्माताई कांबळे, ज्योती चव्हाण, ज्योती रसाळे, रेश्मा कांबळे, जनाताई वाघमारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.