ETV Bharat / state

खरोळमध्ये दहा दिवसात दोन आत्महत्या तर एकाचा मृतदेह आढळला विहिरीत - खरोळ गावात आत्महत्या

खरोळा गावालगत असलेल्या एका कोरड्या विहिरीत लखन राऊतराव या व्यक्तीचा मृतदेह पोत्यामध्ये हात-पाय बांधून पडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

Latur crime
लखन राऊतराव
author img

By

Published : Jun 9, 2020, 6:46 AM IST

लातूर - रेणापूर तालुक्यातील खरोळ गाव गेल्या दहा दिवसातील दोन घटनांनी हादरून गेले आहे. आतापर्यंत दोघांनी आत्महत्या केल्या आहेत तर सोमवारी गावालगतच्या कोरड्या विहिरीत एका ३० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमागचे कारण काय? याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर अव्हान आहे.

खरोळमध्ये दहा दिवसात दोन आत्महत्या

खरोळा गावालगत असलेल्या एका कोरड्या विहिरीत लखन राऊतराव या व्यक्तीचा मृतदेह पोत्यामध्ये हात-पाय बांधून पडलेल्या अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे लखन राऊतराव याच्या पत्नीने गळफास घेऊन दहा दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. पत्नी मनिषाच्या आत्महत्येनंतर लखन याच्यासह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून लखन हा गावात नव्हता तर मनिषाचे सासू-सासरे व इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

दरम्यान, घटनेचा शोध सुरू असतानाच गावातील विजय छप्रे या २५ वर्षीय तरुणाने देखील आत्महत्या केली होती. त्यामुळे या दोन आत्महत्यांचा आणि सोमवारी विहिरीत लखन राऊतरावचा आढळलेला मृतदेह याचा काय संबंध आहे का याचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे पत्नी मनिषाने केलेल्या आत्महत्येच्या घटनेत पती लखन राऊतराव याच्या गुन्हा नोंद करण्यात आला होता. गेल्या दहा दिवसांत गावात घडलेल्या या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

या तिन्ही घटनांची नोंद रेणापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत प्रतिक्रीया देण्यास नकार दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.