ETV Bharat / state

लातुरात अवैध दारू विक्री; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त - अवैध दारू लातूर

म्हसोबावाडी येथे एका हॅाटेलमध्ये अवैधरीत्या विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार उस्मानाबाद व लातूर येथील भरारी पथकाने कारवाई केली. यात एकून ८ लाख ६० हजार ५२० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

illegal-liquor-in-latur-police-file-case-against-seller
लातुरात अवैध दारू विक्री
author img

By

Published : Feb 6, 2020, 12:50 PM IST

लातूर- निलंगा तालुक्यातील म्हसोबावाडी येथे अवैधरीत्या विदेशी दारुची विक्री होत आहे. यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उस्मानाबाद व लातूर भरारी पथकाने छापा टाकला. यात ८ लाख ६९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा- दिल्ली विधानसभेसाठी रचला राम मंदिराचा 'पाया', शिवसेनेचा भाजपवर निशाणा

तालुक्यातील औराद शहाजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या म्हसोबावाडी येथे एका हॅाटेलमध्ये अवैधरीत्या विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार उस्मानाबाद व लातूर येथील भरारी पथकाने कारवाई केली. यात एकूण ८ लाख ६० हजार ५२० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. काशिनाथ तोरसल्ले याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक मिलिंद गरुड, दुय्यम निरीक्षक एस पी काळे, जे एस राऊत, जवान राजेश गिरी, महेश कंकाळ, विशाल चव्हाण, इजाज शेख यांनी केली.

Intro:राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची म्हसोबावाडीत कारवाई
८ लाख ६९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त...Body:राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची म्हसोबावाडीत कारवाई
८ लाख ६९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त...

स्थानिक पोलिस प्रशासन डोळे असून आंधळे....

निलंगा /प्रतिनिधी
तालुक्यातील म्हसोबावाडी येथे अवैधरीत्या परराज्यातून आणून विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उस्मानाबाद व लातूर भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात ८ लाख ६९ हजार ५२० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला.
तालुक्यातील औराद शहाजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या म्हसोबावाडी येथे गेल्या अनेक दिवसांपासून रोडलगत असलेल्या जय भवानी हाॅटेल येथे परराज्यातून उत्पादन शुल्क बुडवून अवैधरीत्या विदेशी दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळताच उस्मानाबाद व लातूर येथील भरारी पथकाने विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद विभाग व मा. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क लातूरचे गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आंधारात ठेवून मंगळवार (दि ४) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान निलंगा औराद रोडवर म्हसोबावाडी येथील हॉटेल जय भवानी येथे छापा टाकला असता काशिनाथ विठ्ठल तोरसल्ले यांना अवैधरित्या उत्पादन शुल्क चुकवून शेजारील राज्यातील गोवा निर्मित विदेशी मद्य देशी दारू व अन्य कंपनीचे बनावट लेबल लावलेली ३८४ बाटल्या व एक चार चारचाकी वाहन ज्याची एकूण किंमत ८ लाख ६० हजार ५२० इतक्या रुपयाचा माल जप्त करून आरोपी काशिनाथ तोरसल्ले याच्यावर गुन्हा दाखल केला. सदरील कारवाईत निरीक्षक मिलिंद गरुड, दुय्यम निरीक्षक एस पी काळे, जे एस राऊत व जवान राजेश गिरी, महेश कंकाळ, विशाल चव्हाण, इजाज शेख इत्यादीचा समावेश होता. सदरील कारवाई मुळे स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची गोची झाल्याची चर्चा आहे ...Conclusion: औराद शा.स्थानिक पोलिस प्रशासन ,डोळे असून आंधळे असल्याचे सोंग करत असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.