ETV Bharat / state

Husband forced for rape : पतीने शेतमालकाला पत्नीवर करायला लावला सामुहिक बलात्कार - SP Nikhil Pingale

पतीनेच आपल्या शेतमालकाला व त्याच्या भावाला (Husband forced to farm owner) पत्नीवर सामुहिक बलात्कार करायला ( to gang rape of wife) लावल्याची लाजीरवाणी घटना औसा तालूक्यातील सारोळा परिसरात घडली आहे. पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून (From a family dispute) हा प्रकार केल्याचे समोर येत आहे.

Gang rape of a woman
महिलेवर सामुहिक बलात्कार
author img

By

Published : Apr 17, 2022, 10:15 AM IST

Updated : Apr 17, 2022, 10:50 AM IST

औसा/लातूर: पतीनेच आपल्या शेतमालकाला व त्याच्या भावाला पत्नीवर सामुहिक बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना औसा तालूक्यातील सारोळा परिसरात घडली आहे. धक्कादायक हे की बलात्कारानंतर पीडितेने सुमारे 15 किलोमिटरचे आंतर पायी चालत जावून मध्यरात्री लातुरच्या दोन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पीडितेला मदत मिळाली नाही. अखेर पोलीस अधिक्षकांच्या सुचनेनंतर पतीसह तिघांविरुध्द औसा पोलिसांत बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रहिवासी असलेली एक 33 वर्षीय महिला नव-यासह औसा तालुक्यातील सारोळा रोडवर असलेल्या एका शेतात सालगडी म्हणून वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी या नवरा-बायकोमध्ये भांडण झाल्यामुळे ही महिला लातूरला आईकडे राहायला आली होती. नवरा-बायकोचे भांडण तात्पुरते मिटल्यानंतर पिडीत महिलेच्या आईने नऊ एप्रिल रोजी या महिलेला तिच्या नव-याकडे शेतात सोडले होते.

शेतात आणून सोडलेल्या रोजी रात्री नऊच्या सुमारास पिडीत महिलेच्या पतीने शेताचे मालक असलेले इल्लु शेख आणि मुसा शेख या दोघांना घरी बोलावले. त्यानंतर पतीने त्या दोघांना स्वतःच्या पत्नीवर बलात्कार करण्यास सांगीतले. त्यानुसार पतीसमोरच या दोघांनी महिलेवर बलात्कार केला. घटनेनंतर पिडित महिलेने मध्यरात्री सुमारे 15 किलो मिटर अंतर चालत जाऊन लातूर शहरातील ग्रामीण पोलीस ठाणे आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला परंतू येथील पोलीस प्रशासनाने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे जाण्याचा सल्ला त्या महिलेला दिला.

त्यानुसार सदर महिलेने आपल्या आईला सोबत घेवून पोलीस अधीक्षक निखील पिंगळे (SP Nikhil Pingale) यांची भेट घेतली. त्या महिलेची स्वतःवरील अत्याचाराची हकीकत ऐकल्यानंतर अधिक्षकांनी औसा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोपी पतीसह अन्य दोघांविरुध्द औसा पोलिसांत ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर पवार या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी 'ई-टीव्ही भारत'शी दुरध्वनीवरुन बोलताना दिली आहे.

हेही वाचा : MAN KILLS WIFE : जेवणात जास्त मीठ टाकल्याने संतापलेल्या पतीने केली पत्नीची हत्या

Last Updated : Apr 17, 2022, 10:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.