ETV Bharat / state

World AIDS Day : 'हॅपी इंडीयन व्हिलेज'मुळे एचआयव्ही बाधितांच्या आयुष्याला उभारी ; वाचा ईटीव्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट

लातूर जिल्ह्यातल्या हासेगावमध्ये मागील अनेक वर्षापासून 'सेवालय' ही संस्था चालवली जात (Happy Indian Village in Latur) आहे. 18 वर्षावरील मुलांसाठी संस्थेने देशातील पहिले 'हॅप्पी इंडियन व्हिलेज' बनवले (hiv affected couples lives) आहे. याच हॅपी इंडियन व्हिलेजमधील पीडित महिला विवाहित होत दोन मुलांची आई झाली आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त पीडित महिलाने 'ई-टीव्ही भारत'ला सांगितलेली तिची कहानी पाहा.

World AIDS Day
जागतिक एड्स दिन
author img

By

Published : Dec 1, 2022, 12:24 PM IST

लातूर : लातूर जिल्ह्यातल्या हासेगावमध्ये मागील अनेक वर्षापासून 'सेवालय' ही संस्था चालवली जात (Happy Indian Village in Latur) आहे. 18 वर्षावरील मुलांसाठी संस्थेने देशातील पहिले 'हॅप्पी इंडियन व्हिलेज' बनवले (hiv affected couples lives) आहे. यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे रवी बापटले यांनी सुरुवातीपासून अनेक संकटांचा सामना करत ही संस्था चालवत आहेत. येथील एचआयव्ही बाधित मुलांना डॉक्टर इंजिनिअर होण्याचा स्वप्न देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत आहेत. याच हॅपी इंडियन व्हिलेजमधील पीडित महिला विवाहित होत दोन मुलांची आई झाली आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त राणीने 'ईटीव्ही भारत'ला सांगितलेली तिची कहानी पाहा.

बारा वर्षाचा सुखी संसार : पीडित महिला म्हणाली की, मी उस्मानाबादच्या ग्रामीण भागातून हासेगांवच्या सेवालयात आले. आईच्या गर्भात असतानाच मला एडसची बाधा झाली. माझ्या परिवारात सर्वप्रथम वडीलांना एड्सची लागण झाली होती. त्यानंतर आईला, मला व माझ्या लहान भावाला लागण झाली. मी इयत्ता तिसरीत असताना माझ्या लहान भावाचा एडसची बाधा झाल्याने मृत्यू झाला. त्यानंतर वडीलांचा व आईचा मृत्यू झाला. मी इयत्ता पाचवीत शिकत असताना माझ्या काकाच्या एका डॉक्टर मित्राने हासेगावच्या सेवालयाची माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे मला सेवालयात सोडण्यात आले. सेवालयातील लहान लेकरांसाठी पाहून मी इथेच राहण्याचा निर्णय घेतला. पुढे बारावीपर्यंतचे शिक्षणही मी पूर्ण केले. सन 2014 मध्ये विकास नामक एक एड्सबाधित तरुणांसोबत माझे सेवालालयातच लग्नही झाले. लग्नानंतरच्या तब्बल बारा वर्षाचा सुखी संसार सुरु असून आम्हा दोन गोंडस मुली आहेत. आम्ही दोघे एचआयव्ही पॉझीटीव्ह असलो तरी माझ्या दोन्हीही मुली एचआयव्ही निगेटीव्ह आहेत, याचा आम्हाला आनंद (hiv affected couples) आहे.

हॅपी इंडीयन व्हिलेज'मुळे एचआयव्ही बाधितांच्या आयुष्याला उभारी

सेवालयाची सुरुवात अपघाताने : सेवालयाचे प्रमुख रवी बापटले म्हणाले की, 'हॅपी इंडियन व्हिलेज'च्या अगोदर सेवालयाची सुरुवात अपघातानेच झाली. एका एचआयव्ही संक्रमित मुलाचा मृत्यू झाला होता. त्याचा अंत्यविधी कोणीही करत नव्हते. तो प्रसंग पाहून मी त्याचा अंत्यविधी केली. प्रचंड वाईट परिस्थितीत त्या मुलाला ठेवले होते. ते दृश्य पाहून माझे मन हेलावून गेले. त्याच वेळी निर्णय घेतला की एचआयव्ही बाधित लेकरांसाठी काम करायचे. त्यावेळी माझ्याकडे एक सोडून दोन नोकऱ्या हातात होत्या. प्राध्यापक, पत्रकारिता या दोन्हीचाही राजीनामा दिला. त्याच वेळी घर सोडायचाही निर्णय घेतला. औसा तालूक्यातील हासेगांवच्या मन्मथआप्पा मुक्ता यांनी साडेसहा एकर जमीन सेवालयाला दान दिली अन सेवालयाच्या कामाला सुरवात झाली. ज्यावेळी काम सुरू केले. त्यावेळी कसलीही व्यवस्था इथे नव्हती. सुरुवातीचा काळ कठीण गेला. सेवालयात लाईट घेण्यासाठी हासेगांव ग्रामपंचायतला अर्ज केला, तेंव्हा उत्तर म्हणून सेवालयावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामपंचायतच्या बैठकीत घेतल्याचे सांगण्यात आले. गावातून या सेवालयाच्या उपक्रमाला प्रचंड विरोध होता. तो विरोध बाजूला सारून आम्हाला काम करायचे होते. शिवाय गावकऱ्यांचे मत परिवर्तन करुन त्यांना सोबत घ्यायचे (hiv affected) होते.

हॅपी इंडियन व्हिलेज'ची गरज : सेवालयात हळूहळू एचआयव्ही संक्रमित मुले येत गेली आणि आम्ही काम करत गेलो. त्या दरम्यान एड्स या आजारावर एक औषध उपलब्ध झाल्याने या मुलांचे आयुष्य वाढत गेलं. सेवालालयात दहावीपर्यंत मुले शिकतात. दहावीनंतर त्यांना लातूर शहरातील विविध महाविद्यालयात पाठवण्यात येते. आज यातील ब-याच मुलांनी उच्च शिक्षणही घेतलेले आहे. ही सर्व मुले जेंव्हा 18 वर्षाची झाली तेव्हा खरी 'हॅपी इंडियन व्हिलेज'ची गरज भासली. कारण 18 वर्षापर्यंत सांभाळणाऱ्या संस्था अनेक आहेत, पण वयाच्या 18 वर्षानंतरच्या मुलांना सांभाळणाऱ्या संस्था उपलब्ध नव्हत्या. 'हॅपी इंडियन व्हिलेज'मध्ये 18 वर्षानंतरच्या मुलांना सांभाळून त्यांचे शिक्षण, लग्न, आरोग्य यासह अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात. शिवाय त्यांचे पुनर्वसन करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहोत. येथील जवळपास 18 जोडप्यांची लग्न या व्हिलेजमध्ये झाली आहेत. विवाहित जोडप्यांना राहण्यासाठी त्यांच्या हक्काचे घरं दिले आहेत. 'हॅपी इंडियन व्हिलेज' हे पुनर्वसन केंद्र बनले असून येथील विवाहित जोडप्यांना गोंडस मुलेही झाली आहेत. ही मुले एचआयव्ही निगेटिव्ह आहेत याचा सर्वाधिक आनंद 'हॅपी इंडियन व्हिलेज'ची संकल्पना साकारताना होत असल्याचे 'हॅपी इंडियन व्हिलेजचे संचालक रवी बापटले यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना (World AIDS Day) सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.