ETV Bharat / state

लातूर शहरात घुमला घंटागाडीचा नाद ; गाडगेबाबांना अनोखे अभिवादन - लातूर महानगरपालिका

संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त लातूर महानगरपालिकेच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. मनपाच्या सर्व घंटागाड्या एकत्र करून शहरातील मुख्य मार्गावर स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

लातूर
लातूर
author img

By

Published : Dec 21, 2020, 12:33 PM IST

लातूर - स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त लातूर महानगरपालिकेच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता. मनपाच्या सर्व घंटागाड्या एकत्र करून शहरातील मुख्य मार्गावर स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. शिवाय स्वच्छतेबाबत सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सामूहिक शपथ घेतली.

लातूर शहरात घुमला घंटागाडीचा नाद ; गाडगेबाबांना अनोखे अभिवादन

शहरातील कचऱ्याचे संकलन करण्यासाठी मनपाच्या जवळपास 130 घंटागाड्या आहेत. दररोज 'स्वच्छ शहर, सुंदर शहरा'साठी धावणाऱ्या घंटागाड्यांनी रविवारी स्वच्छतेबरोबर जनजागृतीही केली. डॉ. आंबेडकर पार्क येथे संत गाडगेबाबा यांना अभिवादन करून या अनोख्या रॅलीला सुरवात झाली होती. महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी शुभारंभ केला. मनपाचे स्वछता कर्मचारी आणि अधिकारी यांच्या परिश्रमामुळे लातूर शहर हे स्वच्छ आणि सुंदर राहत आहे. यामध्ये सातत्य राहणे आवश्यक असून स्वच्छतेसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.

वसुंधरा अभियानाचा प्रारंभ -

आज स्वच्छतेच्या बाबतीत शहर 137 व्या क्रमांकावर आहे. यामध्ये सातत्य ठेऊन शहराला स्वच्छतेत पहिला क्रमांक मिळवून देण्याचा विश्वास महापौर यांनी व्यक्त केला. यावेळी माझी वसुंधरा या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपायुक्त मंजुषा गुरमे, नगरसेवक विकास वाघमारे, रमाकांत पिडगे, संजय कांबळे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

शहर स्वच्छतेची शपथ -

प्लॅस्टिक बंदीच्या नियमांचे पालन करून पर्यावरण संवर्धन तसेच स्वच्छतेच्या बाबतीत शहराला पहिल्या 10 क्रमांकाच्या यादीत आणण्याची शपथ सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी घेतली. शहरातील गंजगोलाई, विवेकानंद चौक, शाहू चौक, गूळ मार्केट, महात्मा गांधी चौक या भागातून ही रॅली काढण्यात आली होती.

हेही वाचा - हत्तीला धडकून पुरी-सूरत एक्स्प्रेस रुळावरुन घसरली; प्रवासी सुखरुप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.