लातूर : शहराच्या नजिक असलेल्या बाभळगाव शिवारात एका ६० वर्षीय शेतकऱ्याच्या प्रेताचे तुकडे ( Corpse pieces of 60 yearsold farmer ) त्याच्याच शेतात आढळून आल्याने गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा शेतकऱ्याचा खून आहे कि, हिंस्त्र प्राण्याने केलेला हल्ला ( Murder or attack by violent animals ) हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बशीर शेख असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
ग्रामीण पोलिसांशी साधला संपर्क : रात्रीची लाईट नसल्याने बॅटरी घेऊन ते पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. रात्री आठ वाजेपर्यंत ते पाणी देत असल्याचे किंवा शेतात बॅटरी चमकत असल्याचे अन्य शेतकरी म्हणतात. परंतू मंगळवारीही बशीर शेख घरी आलेच नाहीत. नातेवाईकांनी शेजारी, नातेवाईक यांच्याकडे माहिती घेतली पण तपास नाही लागला. पण मयत बशीर शेख यांच्या पायातील बुट, त्यांची लुना ही दुचाकी तिथे सापडली. तेंव्हा त्यांच्या नातेवाईकांना काहीतरी विपरित घडल्याची शंका आलीच होती. शेतात त्यांचे दोन पाय, एक हात हे शरिरापासून वेगळे अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. तात्काळ नातेवाईकांनी लातूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी व वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
खुन की हिंस्र प्राण्याचा हल्ला : शेतात आढळून आलेले शरीराचे तुकडे बशीर शेख यांचेच असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास लातूर ग्रामीण पोलिस करित आहेत. बाभळगांवच्या बशीर शेख यांचा खुन की हिंस्र प्राण्याचा हल्ला याचे गुढ अद्याप कायम आहे.