ETV Bharat / state

शेतकऱ्यांची चारा छावणीची मागणी, अधिकारी म्हणतात शेतकऱ्यांची मागणीच नाही

जिल्ह्यात सर्वत्र चाराटंचाई असताना चारा छावण्या उभारल्या जात नाहीत. सध्या औसा, अहमदपूर, जळकोट येथून मागणी होत असताना देखील चालढकल केली जात आहे, तर नैसर्गिक संकटाबरोबरच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जनावरे विकण्याची वेळ आली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

जनावरांसाठीचा चारा
author img

By

Published : Apr 24, 2019, 8:08 PM IST

Updated : Apr 24, 2019, 8:50 PM IST

लातूर - कडब्याची एक पेंडी ३० रुपयाला मिळते. ओला चारा तर जिल्ह्यातून हद्दपार आहे. एवढेच नाहीतर जनावरांना देखील विकतचे पाणी पाजण्याची वेळ आली आहे. त्यासाठी शेतकरी चारा छावण्यांची मागणी करत आहेत. मात्र, अधिकारी सांगतात की शेतकरी चारा छावण्यांची मागणी न करत रोख रक्कमेची मागणी करतात. जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी प्रशासकीय भाषेत शेतकऱ्यांच्या मागणीला डावलून लावत आहेत.

चारा छावणीची मागणी करताना अधिकारी

लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई बरोबरच चारा टंचाईच्याही झळा जाणवू लागल्या आहेत. यंदा रब्बी हंगामात ज्वारीचा पेरा झाला. मात्र, पाण्याअभावी कडबा झाला नसल्याचे शेतकऱ्यांना सध्या चारा टंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ३२५ गाई, तर २ लाख ३२ हजार ५८४ म्हैस अशी एकूण ५ लाख ९३ हजार ९०९ जनावरे आहेत. गेल्या काही वर्षांपासून या जनावरांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चाराटंचाई लक्षात घेता स्वतः जवळची जनावरे विकली, असल्याचे पशुसंवर्धन अधिकारी भुपेंद्र बोधनकर म्हणाले.

जैन संघटनेने उभारलेल्या छावणीचा ६८२ जनावरे आधार घेत असल्याचेही ते सांगायला विसरले नाहीत. मात्र, जिल्ह्यात सर्वत्र चाराटंचाई असताना चारा छावण्या उभारल्या जात नाहीत. सध्या औसा, अहमदपूर, जळकोट येथून मागणी होत असताना देखील चालढकल केली जात आहे, तर नैसर्गिक संकटाबरोबरच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जनावरे विकण्याची वेळ आली असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेजारच्या बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात शेकडो छावण्या सुरू आहेत. मात्र, लातूर जिल्ह्यात एकही छावणी सुरू नसल्याने शेतकाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

Intro:बाईट : शेतकरी (2)
भुपेंद्र बोधनकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
शेतकऱ्याने जनावरे विकली, आता काय छावणीची गरज ; पशुसंवर्धन विभागाचा जावईशोध
लातूर : कडब्याची एक पेंडी 30 रुपयाला...ओला चारा तर जिल्ह्यातून हद्दपार आहे...चाराच नाही तर जनावरांना पाणी देखील विकतचे पाजण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असताना जिल्ह्यात एकही चारा छावणी सुरू करण्याची तसदी जिल्हा प्रशासनाने घेतली नाही. उलट जिल्ह्यातील शेतकरी हुशार असून भविष्यातील टंचाई लक्षात त्याने पशुधन विकले आहे. त्यामुळे 30 ते 40 टक्के पशुधन कमी झाले असून आता जिल्ह्यात छावणीची गरजच नसल्याचा निर्वाळा जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग देत आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथे जैन संघटनेच्यावतीने चारा छावणी उभारण्यात आली असून यामध्ये तब्बल 682 पशुधनाची गुजराण होत आहे.

Body:लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई बरोबरच चारा टंचाईच्याही झळा जाणवू लागल्या आहेत. यंदा रब्बी हंगामात ज्वारीचा पेरा झाला खरा मात्र, पाण्याअभावी कडबा न होता शेतकऱ्यांना बाटककावरच समाधान मानावे लागले होते. परिणामी सध्या चारा टंचाईचा सामना करावा लागत असून प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यात गाय वर्ग 3 लाख 61 हजार 325 तर म्हैस वर्गाची 2 लाख 32 हजार 584 अशी एकूण 5 लाख 93 हजार 909 जनावरे आहेत. असे असताना देखील चारा छावणीची अजून 4 महिने गरजच नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी भुपेंद्र बोधनकर यांनी तर वेगळाच जावई शोध लावत शेतकऱ्यांनी टंचाई लक्षात घेता स्वतः जवळची जनावरे विकली असून आता छावणीची गरज नसल्याचे सांगितले. त्यामुळे पशुसंवर्धन करण्यावर या विभागाचा भर आहे की जिल्ह्यात चाराटंचाई नसल्याचा अविर्भाव आणण्यात त्यांना अधिक रस आहे याबाबत शंका व्यक्त होत आहे. शिवाय दुसरीकडे जैन संघटनेने उभारलेल्या छावणीचा 682 जनावरे आधार घेत असल्याचे हेच अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे एकीकडे चाराटंचाई असल्याचे दिसत असतानाही छावण्या सुरू केल्या जात नाहीत. सध्या औसा, अहमदपूर, जळकोट येथून मागणी होत असताना देखील चालढकल केली जात आहे. तर नैसर्गिक संकटाबरोबरच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जनावरे विकण्याची वेळ आली असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेजारच्या बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात शेकडो छावण्या सुरू आहेत मात्र लातूर जिल्ह्यात एकही छावणी सुरू नसल्याने शेतकाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

Conclusion:शिवाय 4 महिने चाऱ्याची टंचाईच भासणार नसल्याचे सांगून भविष्यातही जिल्ह्यात चारा छावणी सुरू होते की नाही याबाबत शंका व्यक्त होत आहे. महसूल विभागाने टंचाईचा आढावा सादर करणे आवश्यक असल्याचेही पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.
Last Updated : Apr 24, 2019, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.