लातूर - जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 हजार 774 वर गेला असून सध्या 2 हजार 974 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांसाठी सुमारे दोन हजार ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता आहे. मात्र, लातुरात 900 ते एक हजार ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती होत आहे. ही निर्मिती जिल्ह्यातील दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून केली जाते. मात्र दोनऐवजी पाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची निर्मिती झाली तरच जिल्ह्यात पुरेल इतक्या ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकते, असे जिल्हा शल्य चिकीत्सक ढगे यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्मिती व एक खासगी ठिकाणी ऑक्सिजनची निर्मिती होते. यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन लिक्विडचा पुरवठा हा पुण्यातून होत आहे. यासाठी 13 हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर वाहतूक करत आहेत. तर ऑक्सिजन सेंटरहून आवश्यक त्या वाहनातून रुग्णालयाच्या ठिकाणी पुरवठा केला जात आहे. हवेतून ऑक्सिजन निर्मिती होणारा प्रकल्प वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उभारण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरळीत पुरवठा होत आहे. निर्मिती झालेल्या ऑक्सिजनचा पुरवठा तर सुरळीत होत आहे. पण, 2 हजार सिलिंडरची मागणी असताना 1 हजार सिलिंडर निर्मित होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात 2 प्रकल्पाऐवजी 5 प्रकल्प उभारण्यात आले तर टंचाई भासणार नाही, असे जिल्हा शल्य चिकीत्सक ढगे यांचे म्हणणे आहे.
मात्र, सध्या दिवसाकाठी तीनशेहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. तर ऑक्सिजनचा पुरवठा हा पूर्वीप्रमाणेच होत आहे.
हेही वाचा - खरिपातील मुख्य पीक धोक्यात; शेतकऱ्यांच्या चिंतेत भर...!