ETV Bharat / state

कर्ज काढून पिकांचा विमा उतरवण्याची शेतकऱ्यांवर नामुष्की - loan

आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली मात्र, समाधानकारक पाऊस नसल्याने पिकांची जोपासना होते की नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे पीक विमा आवश्यक असला तरी पैशाअभावी काढावा कसा असा सवाल उपस्थित होत आहे.

कर्ज काढून पिकांचा विमा उतरवण्याची शेतकऱ्यांवर नामुष्की
author img

By

Published : Jul 12, 2019, 5:02 PM IST

लातूर - पिकांना संरक्षण कवच म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेकडे पाहिले जाते. गेल्या 3 वर्षापासून या योजनेचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाला असून यंदाही पिकांची स्थिती नाजूक असल्याने या पीक विमा योजनेचाच आधार शेतकऱ्यांना घ्यावा लागणार आहे. मात्र, विमा काढायच्या प्रक्रियेला सुरवात झाली असली तरी प्रत्यक्षात पेरणीच नसल्याने कशाचा विमा काढावा आणि कसा काढावा हा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या 12 लाखांपर्यंत असून आजपर्यंत केवळ 2000 शेतकऱ्यांनी पीकविमा काढल्याची नोंद शासन दरबारी आहे.

कर्ज काढून पिकांचा विमा उतरवण्याची शेतकऱ्यांवर नामुष्की

आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली मात्र, समाधानकारक पाऊस नसल्याने पिकांची जोपासना होते की नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे पीक विमा आवश्यक असला तरी पैशाअभावी काढावा कसा असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्ह्यात खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र 8 लाख हेक्टरहून अधिक असून शेतकऱ्यांची संख्या 11 लाखावर आहे, तर 6 लाख शेतकरी हे सभासद आहेत. हंगामाच्या सुरवातीपासूनच जिल्ह्यात एकही समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडलेल्या आहेत. सरासरीच्या केवळ 14 टक्के पाऊस झाला असून 9 टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे पेराच नाही तर कशाचा विमा उतरावा असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे.

भर पावसाळ्यात चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना शेतकरी पिकांचा विमा कसा भरणार. लातूर जिल्हा बँक आणि इतरत्र राष्ट्रीयीकृत बँकांकडून 4000 हजारावर अर्ज कृषी कार्यालयाकडे दाखल झाले आहेत. पैकी 2000 शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. शेतकरी संख्येच्या तुलनेत विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नगण्य आहे. गतवर्षी तब्बल 3 लाख शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला होता. जिल्ह्यात औसा, लातूर, देवणी, चाकूर या तालुक्यातील पेरण्या रखडल्या आहेत, तर ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. त्यांना आता पावसाने उघडीप दिल्याने चिंतेचा सूर दिसून येत आहे. अगोदरच पेरणीसाठी पैसे हात उसने घ्यावे लागले असून पिकांचा विमाही कर्ज काढूनच काढावा का अशी स्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन हे खरिपातील महत्वाचे पीक मानले जाते. त्यानुसार या पिकावरच अधिकचा विमा काढला गेला आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा आणि आर्थिक चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यांवर कर्ज काढून विमा उतरावा लागत आहे.

खरिपातील 90 टक्के क्षेत्र अजूनही पावसाच्या प्रतिक्षित आहे. पेरणी न होताच विमा काढता येतो का या संभ्रमतेमध्येही जिल्हयातील शेतकरी आहेत. 24 जुलै ही पीक विमा भरण्याची अंतिम तारीख असली तरी दुहेरी अडचणीत असलेला बळीराजा ही रक्कम कशी अदा करेल हा सवाल आहे.

Intro:महिला बाईट : लता कांबळे, हरंगूळ ( बु) शेतकरी
कर्ज काढून पिकांचा विमा उतरवण्याची शेतकऱ्यांवर नामुष्की
लातूर : पिकांना संरक्षण कवच म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेकडे पाहिले जाते. गेल्या 3 वर्षापासून या योजनेचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाला असून यंदाही पिकांची स्थिती नाजूक असल्याने या पीक विमा योजनेचाच आधार शेतकऱ्यांना घ्यावा लागणार आहे. मात्र, विमा काढायच्या प्रक्रियेला सुरवात झाली असली तरी प्रत्यक्षात पेरणीच नसल्याने कशाचा विमा काढावा आणि कसा काढावा हा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या 12 लाखांपर्यंत असून आजपर्यंत केवळ 2000 शेतकऱ्यांनी पीकविमा काढल्याची शासन दरबारी आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली मात्र, समाधानकारक पाऊस नसल्याने पिकांची जोपासना होते की नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे पीक विमा आवश्यक असला तरी पैशाअभावी काढावा कसा असा सवाल उपस्थित होत आहे.

Body:जिल्ह्यात खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र 8 लाख हेक्टरहून अधिक असून शेतकऱ्यांची संख्या 11 लाखावर आहे तर 6 लाख शेतकरी हे सभासद आहेत. हंगामाच्या सुरवातीपासूनच जिल्ह्यात एकही समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडलेल्या आहेत. सरासरीच्या केवळ 14 टक्के पाऊस झाला असून 9 टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे पेराच नाही तर कशाचा विमा उतरावा असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. भर पावसाळ्यात चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना शेतकरी पिकांचा विमा कसा भरणार. लातूर जिल्हा बँक आणि इतरत्र राष्ट्रीयीकृत बँकांकडून 4000 हजारावर अर्ज कृषी कार्यालयाकडे दाखल झाले आहेत. पैकी 2000 शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. शेतकरी संख्येच्या तुलनेत विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नगण्य आहे. गतवर्षी तब्बल 3 लाख शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला होता. जिल्ह्यात औसा, लातूर, देवणी, चाकूर या तालुक्यातील पेरण्या रखडल्या आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे त्यांना आता पावसाने उघडीप दिल्याने चिंतेचा सूर दिसून येत आहे. अगोदरच पेरणीसाठी हात उसने घ्यावे लागले असून पिकांचा विमाही कर्ज काढूनच काढावा का अशी स्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन हे खरिपातील महत्वाचे पीक मानले जाते. त्यानुसार या पिकावरच अधिकचा विमा काढला गेला आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा आणि आर्थिक चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यांवर कर्ज काढून विमा उतरावा लागत आहे.

Conclusion:खरिपातील 90 टक्के क्षेत्र अजूनही पावसाच्या प्रतिक्षित आहे. पेरणी न होताच विमा काढता येतो का या संभ्रमतेमध्येही जिल्हयातील शेतकरी आहेत. 24 जुलै ही पीक विमा भरण्याची अंतिम तारीख असली तरी दुहेरी अडचणीत असलेला बळीराजा ही रक्कम कशी अदा करेल हा सवाल आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.