ETV Bharat / state

विशेष : होय... आम्ही बंदी असलेल्या बियाणांचा पेरा केलाय!

author img

By

Published : Jun 14, 2020, 10:54 AM IST

Updated : Jun 25, 2020, 3:51 PM IST

शासनाने ज्या शेती पिकांच्या बियाणांवर बंदी घातली आहे. पण, ती बियाणे कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देतात. त्यामुळे बंदी असली तरी आम्ही तीच बियाणे वापरणार, असे म्हणत शेतकरी संघटनेकडून बंदी असलेल्या बियाणांची पेरणी करण्यात आली आहे.

शेतकरी
शेतकरी

लातूर - पावसाच्या समाधानकारक हजेरीनंतर खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. पण, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारचा निषेध करत तंत्रज्ञान स्वातंत्र्य हंगाम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये सरकारने बंदी घातलेल्या जनुकीय सुधारित बियाणांची लागवड केली आहे. यामध्ये कापूस, मका, भात, मोहरी, सोयाबीन, वांगी याचा समावेश असून या बियाणामुळे उत्पादन वाढत असेल तर परवानगी का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बोलताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व शेतकरी

शेतकऱ्यांना आवडीनुसार कोणतेही बियाणे किंवा तंत्रज्ञान वापरण्याचे स्वातंत्र्य देण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या करण्यात आली आहे. सरकारच्या निर्णयाला विरोध करत दोन वर्षांपासून एचटीबीटी कपाशीची जाहीर लागवड करण्यात आली होती. शिवाय जनुकीय सुधारित बियांणांवरील बंदी उठवण्याची मागणी करण्यात आली होती. याकडे दुर्लक्ष होत असल्याने चालू हंगामातही या सुधारित बियाणांची लागवड केली जात असल्याचे शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांनी सांगितले आहे.

जनुकीय बियाणांमुळे उत्पादनात वाढ होते तर हे कमी दराने शेतकऱ्यांच्या पदरी पडते. या बियाणाला इतरत्र देशात परवानगी मिळते मग भारतात का नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय न घेता उलट त्याचे नुकसान होण्याच्या दृष्टीने सरकार विचार करत असल्याचा आरोपही शेतकरी संघटनेने केला आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणाचा विरोध करीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रतिबंधित बियाणांची लागवड केली आहे.

यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य माधव मल्लेशे, माधव कंदे, शिवाजी पाटील, कार्यध्यक्ष बालाजी जाधव, जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी, अशोक पाटील यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - पालकमंत्री अमित देशमुखांच्या बाभळगावातच 2 जणांना कोरोनाची लागण

Last Updated : Jun 25, 2020, 3:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.